Breaking
18 Oct 2024, Fri

भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ (ICICI)

१) ICICI ची स्थापना भारतीय कंपनी कायदा – १९४९ अंतर्गत सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणून खासगी क्षेत्रात करण्यात आली.
२) ICICI ने १९९४ मध्ये खाजगी क्षेत्रात ICICI नावाची व्यापारी बँक स्थापन केली.
३)३ मार्च, २००२ रोजी ICICI चे ICICI बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. ICICI ने ICICI बँक स्थापन करून त्यातच विलीन झाल्यामुळे या विलीनीकरणाला Reverse Merger असे म्हटले जाते.
४) ICICI च्या विलीनीकरणामुळे बँक ही औद्योगिक क्षेत्राला कर्जपुरवठा करणारी व बँकिंग सेवा पुरविणारी भारतातील पहिली वैश्विक बँक म्हणून ओळखली जाऊ लागली.
५) १९९९ मध्ये ICICI बँक ही न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीकृत होणारी भारतातील पहिली बँक ठरली.
६)१६ मे, २०१५ ला शांघाय (चीन) मध्ये विदेशातील पहिल्या शाखेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

भारतीय लघुउद्योग विकास बँक (सिडबी)
स्थापना – 2 एप्रिल, 1990
सिडबी कायदा – 1989
सिडबी सुरवातीस मालकी – भारतीय
औद्योगिक विकास बँकेच्या (आयडीबीआय)
सिडबी स्वतंत्र दर्जा – सप्टेंबर – 2000
मुख्यालय – लखनौ

कार्ये –
1) लघुउद्योगांना वित्तपुरवठा करणे
2) लघुउद्योगांना मार्गदर्शन, वित्तपुरवठा, विकास करणे
3) उघुउद्योगांना वित्तपुरवठा करणार्या व्यापारी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, राज्य औद्योगिक वित्त महामंडळ यामध्ये समन्वय घडवून आणने.
4) एकल खिडकी सेवांगतर्गत स्वदेशी/विदेशी चलनही कर्जरुपात प्राप्त करुण देणे.

भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक मर्यादित

कायदा – 1984
स्थापना- 1971
मुख्यालय – कोलकाता
उद्देश – 1) राष्ट्रीय औद्योगिक विकासाच्या दृष्टीने औद्योगिक उत्पादन संस्थाच्या अडचणी दूर करणे.
2) औद्योगिक उत्पादन संस्थाच्या पुनर्वसनासाठी वित्तीय , पायाभूत सुविधा उपलब्ध करणे.

कार्ये-
1) विविध उद्योगांना वित्तपुरवठा करणे.
2) भाग विमेकरी सेवा पुरविणे
3) एचबीआयएल ही संपूर्ण भारतीय मालकीची विकास वित्तीय बँक आहे.
5) ही बँक आयएफसीआय, आयडीबीआय व आयसीआयसीआय बँकासारखी स्वतंत्र विकास वित्तीय बँक म्हणून कार्य करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *