Breaking
17 Oct 2024, Thu

योजनेची घोषणा – वित्तमंत्री अरुण जेटली द्वारे 2015 16 च्या अंदाजपत्रकीय भाषणात करण्यात आली.
सुरुवात 8 एप्रिल 2015
उद्देश –
1) सूक्ष्म वित्त संस्था, छोटे व्यापारी, रिटेलर, स्वसहायत्ता गट आणि व्यक्तींना कर्ज देणार्या कंपनीस वित्तीय प्रक्रियांमध्ये मदत करणे.
2) लघू व सूक्ष्म व्यवसाय करणार्या स्व उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणे,
3) व्यवसायास सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांना धोरण ठरविण्यासाठी मार्गदर्शन तत्वे ठरवून देणे.
4) सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांची नोंदणी करणे, देखरेख ठेवणे त्यांचा दर्जा ठरविणे
5) सूक्ष्म उद्योगांना देण्यात येणार्या कर्जासाठी गॅरंटी म्हणून के्रडिट गॅरंटी स्कीम तयार करणे.

मुद्रा बँकेचे लक्ष्य –
1) देशातील छोट्या व्यावसायिकांना 5.7 कोटींपेक्षा अधिक बँक कर्ज उपलब्ध करणे

-मुद्रा बँक योजनेचा लाभ
1) या योजनेतून शिक्षित युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल.
2) या योजनेतून छोट्या व्यापार्यांचे मनोबल वाढून देशाचा आर्थिक विकास साध्य करता येईल.
वित्त पुरवठा –
1) शिशु श्रेणी व्यवसायास 50.0000 रु. कर्ज मिळू शकते.
2) किशोर श्रेझी व्यवसायास 50,000 ते 5,00,000 रु. कर्ज मिळू शकते.
3) तरुण श्रेणी व्यवसायिकास 5 ते 10 लाख रु. कर्ज मिळू शकते.
4) मुद्रा बँकेअंजर्गत वार्षिक 7 टक्के दराने वित्तपुरवठा केला.

– मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठीची पात्रता
1) ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.
2) देशातील कोणतीही व्यक्ती ज्याचा स्वतचा किंवा एखाद्या बरोबर भागीदारीचा व्यापार आहे. अशा व्यक्ती आपल्या कागद पत्रांमार्फत मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना शेती वाहतूक, सामुद्रायिक, सामाजिक व वैयक्तिक सेवा, खाद्य उत्पादन आणि टेक्स्टाईल क्षेत्र इ.साठी लागू करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण कागदपत्रे
1) स्व सत्य प्रमाणपत्र
2) दोन फोटो
3) जात प्रमाणपत्र
4) उद्योगासंबंधी कागदपत्रे, लायसेन्स व सर्टिफिकेट
5) उद्योगासंबंधी संपूर्ण माहिती
मुद्रा बँक योजना सिडबीची उपकंपनी या नात्याने कडे बिगर बँकिग वित्तीय संस्था म्हणून नोंदणीकृत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *