Breaking
18 Oct 2024, Fri

जनगणना
१) २०११ ची जनगणना ही भारताची १५ वी तर स्वतंत्र
भारताची सातवी जनगणना म्हणून ओळखली जाते.
२) भारतात जनगणना प्रथम १८७२ मध्ये लॉर्ड मेयो
यांच्याद्वारे करण्यात आली.
३) १८८१ पासून प्रत्येक (लॉर्ड रिपन) १० वर्षांनी
लोकसंख्येचे क्रमिक मापन करण्यात येत आहे.
४) २०११ चे जनगणना आयुक्त डॉ. सी. चंद्रमौली
हे होते. आयुक्तांद्वारे जनगणनेचे संपूर्ण कामकाज
गृहमंत्रालयांतर्गत पार पाडण्यात येते. (२००१
जनगणना आयुक्त – जी. के.भाटिया)
५) २०११ जनगणना घोषवाक्य “आपली
जनगणना, आपले भविष्य”
६)२०११ च्या जनगणनेत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही
तयार करण्यात आली.
७)भारतात जागतिक लोकसंख्येच्या १७.५% (२०११
च्या जनगणनेनुसार) लोकसंख्या आढळते.
८) लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात चीननंतर
दुसरा क्रमांक लागतो.
१)२०११ जनगणना नुसार कर्नाटक व गुजरात राज्याची
१)११ जुलै हा जगातीकलोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो.
२) संयुक्त राष्ट्र जगणना कोषाद्वारे १२ ऑक्टोबर, १९९९ या दिवशी
जगाची लोकसंख्या ६ अब्ज झाल्याची घोषणा करण्यात आली.
३) ३१ ऑक्टोबर, २०११ रोजी लोकसंख्या ७ अब्ज एवढी झाल्याची
घोषणा करण्यात आली.
४) संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) च्या अहवालानुसार २०५० मध्ये
विकासशील देशांची लोकसंख्या ५.६ अब्ज वरून ७.९ अब्ज तर
विकसित देशांची लोकसंख्या १.२३ अब्ज वरून १.२८ अब्ज झाली.
५)भारतात ११ मे, २०००रोजी लोकसंख्या १ अब्ज एवढी (एक अब्जा
वी कन्या – आस्था) झाली असून ती २०५० मध्ये १५९.३ करोड
होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
६ संयुक्त राष्ट्र संघ (UNO) च्या अंदाजाने १९९१-२००१ मध्ये चीनमध्ये
१% पेक्षा कमी वार्षिक वृद्धी (लोकसंख्या) मापण्यात आली. त्याप्रमाणे
भारतात १.९५% वृद्धी मापण्यात आली. जागतिक लोकसंख्या अहवाल
(UNO) नुसार वर्ष २०५० पर्यंत भारत चीनच्या पुढे जाऊन जगातील
सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल.
७) २०११ जनगणना नुसार भारतात २.६८ कोटी लोक अपंग आहेत.
८) जनगणना २०११ नुसार भारतात एकूण कामगार संख्या ४८.१७ कोटी
आहे.
९)जनगणना – २०११

पुरुष लोकसंख्या – ६२.३३ कोटी
स्त्री लोकसंख्या – ५८.७६ कोटी

*जनगणना – 2011
एकूण लेाकसंख्या – 121 कोटी
पुरुष – 51.5 टक्के
स्त्री – 48.5 टक्के

दशवार्षिक वृद्धी – 18.67 टक्के
दशवार्षिक वाढ – 18.22 कोटी

लिंगगुणोत्तर – 943
शिशु लिंगगुणोत्तर – (0.6 वर्ष) 918

ग्रामीण लोकसंख्या – 68.8 टक्के
शहरी लोकसंख्या – 31.2 टक्के

मृतयूदर – 7.3 टक्के
माता मृत्यूदर – 179
शिशुमृत्यूदर – (0.1वर्ष) 42 टक्के

लोकसंख्या घनता –
382 प्रति चौ. घनमीटर

साक्षरता प्रमाण – 73 टक्के

एप्रिल 2010 गृहगणनेला प्रारंभ
31 मार्च 2011 लोकसंख्येचे अंदाजित आकडेप्रकाशित

सरारी आर्युमान – 63.5 टक्के
सर्वाधिक धर्मनिहाय लोकसंख्या हिंदू – (79.8 टक्के)

26 ऑगस्ट 2015 अंतिम आकडेवारी प्रकाशित
26 ऑगस्ट 2015 धर्मनिहाय अंतिम आकडेवारी प्रकाशित
१) प्राथमिक (उच्च स्थिर) अवस्था –
। उच्च जन्मदराबरोबर मृत्युदरही जास्तच असतो

या अवस्थेत एकत्र कुटुंबपद्धती,बालविवाह,अशिक्षित, दैववादी, मुले देवाची देणगी अशा विचारसरणीने जन्मदर उच्च राहतो. तसेच अपौष्टिक आहार, कुपोषण, आरोग्य सुविधाचा अभाव, आजारपण, नैसर्गिक आपत्ती या कारणांमुळे मृत्युदरउच्च राहतो
२) द्वितीय (प्रारंभीची प्रसरणशील) अवस्था
मृत्युदरात घट आणि जन्मदरात वाढ या अवस्थेमध्ये शिक्षण विस्तार, आरोग्य सुविधांमध्ये
वाढ, राहणीमानात वाढ होते. याचा परिणाम म्हणून मृत्युदरात घट होते.- परंतु,सामाजिक परंपरांमुळे
जन्मदरात बदल होत नाही.
३) तिसरी (उशिराची प्रसरणशील) अवस्था
मृत्युदरही कमी होऊ लागतो, जन्मदर कमी होत जातो. या अवस्थेमध्ये सामाजिक, शैक्षणिक बदल, अंधश्रद्धा,
दैववादीष्टिकोन, एकत्र कुटुंबपद्धती इ.चा त्याग केला जातो. याचा परिणाम मृत्युदरही कमी होऊ लागतो.
जन्मदर कमी होत जातो. -या अवस्थेमध्येही लोकसंख्या विस्फोटाची अवस्था काही प्रमाणात आढळते
४) चौथी (निम्न स्तर) अवस्था-
जन्मदर आणि मृत्युदर दोन्ही कमी राहतात या अवस्थेते समाजाची जीवन स्तरात वाढ होते. कुटुंब
नियोजन, उशिरा लग्न करणे अशा पद्धतीचा वापर केला जातो. – या अवस्थेत जन्मदर आणि मृत्युदर दोन्ही कमी राहत, ज्यामुळे संतुलन राहून लोकसंख्या आकारात स्थिरता निर्माण होते.
५) पाचवी (न्हासमान) अवस्था
जन्मदराच्या तुलनेत मृत्युदराचे प्रमाण अधिक असते या अवस्थेस आर्थिक विकासाची शेवटची अवस्था म्हणून ओळखले जाते. या अवस्थेत जन्मदराच्या तुलनेत मृत्युदराचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे लोकसंख्या आकार कमी होतो.- या अवस्थेत देशात पूर्ण रोजगराची अवस्था निर्माण होते.

पहिली अवस्था (उच्च-स्थिर)
१) १८९१ लोकसंख्या २३.६ कोटी ती १९२१ मध्ये २५.१ कोटी झाली.
२) या ३० वर्षांचा लोकसंख्या वाढीचा दर ०.१९ % होता.
३) १९२१ या वर्षाला लोकसंख्या विभाजक वर्ष म्हणून ओळखले जाते-कारण १९११-१९२१ या कालावधीत
१९१९ च्या लोकसंख्येपेक्षा १९२१ च्या लोकसंख्येत ०.१ कोटी लोकसंख्येची म्हणजेच ०.३% घट झाली,
वरील सर्वांचे कारण म्हणजे -जन्मदराच्या विरुद्ध मृत्युदराचे प्रमाण अधिक राहिले.
दुसरी अवस्था (प्रसरणशील)
१)१९२१ लोकसंख्या २५.१ कोटी ती १९५१ मध्ये ३६.१ कोटी झाली. या ३० वर्षांत लोकसंख्या ११.०
कोटी वाढली.
२ १९२१-५१ – लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर १.२२% होता.
३) या लोकसंख्या वाढीचे प्रमुख कारण- प्लेग, महामारी, देवी, कॉलरा या आजारांवर नियंत्रण
केल्यामुळे मृत्युदरात कमी झाली.

३) तिसरी अवस्था (उशिराची प्रसरणशील)लोकसंख्या १९५१ मध्ये ३६.१ कोटी होती, ती वाढून १९८१ मध्ये ६८.३ कोटी झाली. या ३० वर्षांत लोकसंख्या
३२.४ कोटी वाढली.
-या कालावधी (१९५१-१९८१) अंतर्गत लोकसंख्या वाढीचावार्षिक दर २.१४% होता. त्यामुळे या ३० वर्षांच्या
कालावधीस लोकसंख्या विस्फोटाचे वर्ष असेही म्ह णतात.या कालावधी अंतर्गत देशात हॉस्पिटल व आरोग्य सुविधा विस्तार, मृत्युदर नियंत्रण उपाय करण्यात आल्याने लोकसंख्या अधिक गतीने वाढ झाली.
४) चौथी अवस्था (उच्च वृद्धी दर)
या चौथ्या अवस्थेत भारताची लोकसंख्या १९८१ मध्ये ६८.३ कोटी होती. ती वाढून २०११ मध्ये
१२१.०२ कोटी झाली. या ३० वर्षांत लोकसंख्या ५२.७% कोटींनी वाढली.

या कालावधी (१९८१-२०११)
अंतर्गत लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर १.८७% म्हणजे १९५१-१९८१ च्या तुलनेत कमी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *