Monday, June 17, 2024

चलनसंख्यामान सिद्धांत

सिद्धांत – इतर परिस्थिती स्थिर असताना चलनसंख्या दुप्पट केली असता, वस्तूच्या किमती दुप्पट होतात व चलनाचे मूल्य निमपट होते. याउलट चलनसंख्या निम्मी केली असता वस्तूच्या किमती निम्म्या होतात व चलनाचे मूल्य दुप्पट होते.

१) पेशाचा पुरवठा आणि वस्तूची किंमत यामध्ये सरळ संबंध असतो.
२) पैशाचा पुरवठा आणि पैशाच्या मूल्यात विपरीत संबंध असतो.
३) मुद्रेचे मूल्य हे मुद्रेच्या पुरवठ्याच्या व्यस्त प्रमाणात बदलते.
४) फिशरच्या मते मुद्रेची मागणी व्यवहारासाठी T वर अवलंबून असते
५) फिशरच्या समीकरणात P चा संबंध सामान्य किंमत पातळीशी आहे.
६) फिशरच्या समीकरणात मुद्रेच्या भ्रामण वेगावर (v) भर देण्यात आला आहे.
७) फिशरद्वारे देण्यात आलेली व्याख्या दीर्घकालीन आहे.

चलन संख्यामान सिद्धांत – रोख शिल्लक दुष्टीकोन
केंब्रिज समीकरण डॉ. मार्शल, पिगू, केन्स आणि रॉबर्टसन इ. अर्थतज्ज्ञांचा
समावेश होतो. त्यांच्या मते
१) फिशरने चलन संख्यामान सिद्धांत मौद्रिक घटकांचा विचार केला तर वास्तव घटकांकडे दुर्लक्ष केले, त्याचबरोबर पैशाच्या पुरवठ्याला अधिक महत्त्व दिले.
२) केंब्रिज समीकरणात चलनाच्या मूल्यांसंदर्भात पैशाच्या पुरवठ्या बरोबर म
गणीचाही विचार केला.
३) पैशाला असलेली मागणी वस्तूच्या विनिमयाबरोबर मूल्य संग्रहणासाठी
असते.
४) लोकांची रोख पैशाची मागणी उत्पन्नाबरोबरच त्यांच्या मानसिक प्रवृत्तीवर
अवलंबून असते.

१) फिशरच्या मते मुद्रेची मागणी व्यवहारासाठी (T) वर अवलंबून असते
तर केंब्रिज विचारवंतानुसार मुद्रेची मागणी मुद्रासंचय (साठा) करण्यासाठी
केली जाते.
२) फिशरच्या समीकरणात (P) चा संबंध सामान्य किंमत पातळीशी आहे,
तर केंब्रिज समीकरणात (P) चा संबंध उपभोग्य वस्तूंशी आहे.
३) फिशरच्या समीकरणात मुद्रेच्या भ्रमण वेगावर (v) भर देण्यात आला
आहे, तर केंब्रिज समीकरणात रोख शिल्क दृष्टिकोना (K) वर भर देण्यात
आला आहे.
४) फिशरद्वारे देण्यात आलेली व्याख्या दीर्घकालीन आहे,तर केंब्रिज
व्याख्या अल्पकालीन आहे.
केन्स या केंब्रिज अर्थशास्त्रज्ञाने केंब्रिज समीकरणाचे व्यापक स्वरूप
PE a ae a he General Theory of Employment Interest
Money, या ग्रंथात रोकड पसंती दृष्टिकोन या स्वरूपात मांडले.
रोखता पसंती
“मुद्ला असलेली मागणी म्हणजेच रोखतेकरिता असलेली मागणी होय.”
केन्सच्या मते रोखता पसंती मुळे प्रत्येक जण आपल्या उत्पन्नातील ठरावीक भाग / हिस्सा
मुद्रा च्या स्वरूपात स्वतःजवळ रोख स्वरूपात ठेवतो.
१) व्यवहार हेतू
व्यवहार हेतूसाठी असणारी पैशाची मागणी ही व्यक्तीच्या उत्पन्नात होणाच्या बदलानुसार बदलणारी असते. उत्पन्न अधिक असेल तर व्यवहार हेतूसाठी पैशाची मागणी अधिक व उत्पन्न कमी असेल तर मागणी कमी असते.
LP = F (Y)

२) दक्षता हेतु
केन्सच्या मते, दक्षता हेतूसाठी असणारी पैशाची मागणी ही सुद्धा व्यक्तीच्या उत्पन्न पातळीवर अवलंबून असते.
L२ = F (Y)

३) सट्टेबाजी हेतु
केन्सच्या मते सट्टेबाजीच्या हेतूसाठी असणारी पैशाची मागणी व्याजदरावर अवलंबून असते आणि व्याजदर हा रोख्याच्या किमतीवर अवलंबून असतो. म्हणजेच व्याजदर आणि रोख्याच्या किमती यांच्यात व्यस्त संबंध असतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles