महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे.
या भरतीद्वारे रचना सहायक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 177 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. यामुळेच इच्छुक उमेदवारांनी 30 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करावा.
पदाचे नाव: रचना सहायक (गट-ब)
शैक्षणिक पात्रता
यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची शैक्षणिक पात्रता ही स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षांची पदविका असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण
या पदभारतीद्वारे पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती या सर्व विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. तर यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्जशुल्क आकारला जाणार आहे. तर यासाठी अराखीव प्रवर्गसाठी रु. 1000/- इतका अर्ज शुल्क आकारला जाणार असून राखीव प्रवर्ग यांसाठी रु. 900/- इतका अर्ज शुल्क आकारला जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत
दरम्यान, या पदभरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ही 01 एप्रिल 2023 पासून सुरु होणार आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 ही आहे.
वेतन : Rs. 36,800 – 1,22,800/-