”जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेत उत्पादित सर्व वस्तू व सेवांच्या मूल्यात परदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज केली जाते व देशातून बाहेर गेलेले उत्पन्न वजा केले जाते, तेव्हा त्या अंतिम मुल्यास स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात”
GNP = GDP + (X-M)
X = विदेशातून प्राप्त केलेले उत्पन्न
M = भारतातून बाहेर गेलेले उत्पन्न
उदा.- समजा GNP प्राप्त करताना स्वदेशी नागरिक देवेंद्रने विदेशात (अमेरिकेत) प्राप्त केलेल्या उत्पन्नाची बेरीज केली जाते व विदेशी नागरिक जॉर्जने आपल्या देशात (स्वदेशी/भारतात)प्राप्त केलेले उत्पन्न वजा केले जाते.
१ बाजार किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (GNP mp)
”एका वर्षाच्या काळात देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार किंमतीनुसार काढलेले मूल्य म्हणजे बाजारभावानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय.”
(GNPMP = C+ I+G+(X-M) + (R-P)
C = खासगी उपभोग खर्च I=देशांतर्गत खासगी गुंतवणूक
G = सरकार उपभोग, गुंतवणूक खर्च
(X-M) = निव्वळ विदेशी उत्पन्न (-)
(RP) = परदेशातून मिळालेले उत्पन्न
– परदेशातील व्यक्तीने मिळवलेले उत्पन्न
२) घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (GNP fc)
”एका वर्षाच्या काळात उत्पादन घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नाची (मोबदल्यांची) बेरीज केली असता मिळणारे उत्पन्न म्हणजे घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय.”
(GNPFC) = (GNPMP) – Indirect Tax+ Subsidies
(GNPFC) मिळवण्यासाठी बाजार भावानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून अप्रत्यक्ष करांची रक्कम वजा केली जाते व मिळालेले अनुदान समाविष्ट केले जाते.