Breaking
18 Oct 2024, Fri

शेअर्स – एखाद्या कंपनीच्या लहानसा भागात हिश्यास शेअर्स म्हणतात. हे शेअर्सखुल्या बाजारात
खरेदी करता येतात. याच्या मदतीने एखाद्या कंपनीच्या भांडवलामध्ये वृद्धी करण्यात येते.
डिबेंचर – डिबेंचर मोठ्या प्रमाणात एक दीर्घकालीन वित्तीय साधन आहे. जर एखाद्या कंपनीस आपला विस्तार करण्यासाठी अधिक वित्ताची गरज भासत असेल, परंतु ती कंपनी आपले शेअर होल्डर वाढवू ईच्छित नाही, तेव्हा ती कंपनी डिबेंचर सादर करते.ज्या ध्यमातून कोणतीही व्यक्ती एका निश्चित कालावधीसाठी कंपनीत पैसा लावून एका निश्चित व्याज दराचा फायदा घेऊ शकते.
बॉण्ड – एक कर्ज गुंतवणूक प्रमाण पत्र किंवाउधार पत्र असते जे एखादया देशातील सरकार किंवा
कार्पोरेट हाऊसद्वारे गुंतवणुकदारांसाठी सादर करण्यात येते. सरकार किंवा कंपनी भांडवल निर्माण उद्देशाने बाजारातून पैसा उपलब्ध करण्यासाठी बॉण्ड सादर करते. बॉण्ड सादरकर्ता गुंतवणुकदाराद्वारे घेतलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात गुंतवणुकदारास सवलत पत्राच्या रुपाने बॉण्ड सादर करतो. म्हणजेच बॉण्ड सादरकर्ता एक निश्चित व्याज दरावरती निश्चित कालावधीसाठी धनराशी उधार घेतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *