Breaking
14 Jan 2025, Tue

अर्थशास्त्र म्हणजे काय?

) अॅडम स्मिथ
संपत्तीचे उत्पादन वाटणी व विनियम यांचे विवेचन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय.
अॅडम स्मिथ यांच्यामते अर्थशास्त्रात वस्तु व सेवांचे विनिमय आणि उपभोग यास आर्थिक व्यवहार असे म्हणतात. हे व्यवहार ज्या संस्थेत/संघटनेत पार पडतात, त्यास अर्थव्यवस्था असे म्हणतात.

  • प्रो.लिओनेल रॉबिन्स
    अर्थशास्त्र हे साध्ये आणि दुर्मिम पंरतू पर्यायी वापराची सांधने यांच्यात मेळ घालण्याच्या दृष्टीने केलेल्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.
  • अर्थशास्त्रात – उत्पादन, विभाजन, विनिमय, व उपभोग अशा आर्थिक व्यवहारांचा मानवी वर्तनाशी संबंधित घटकांचा अभ्यास करण्यात येतो.
  • अर्थशास्त्र शाखा
  • सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र
    सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा उदा – एक उपभोक्ता, एक उत्पादक, विशिष्ट पेढ्या, विशिष्ठ परिवार, विशिष्ट किमती, विशिष्ठ मजूरी, उत्पन्न, उद्योग, वस्तू, विनिमय, वितरण, मागणी पुरवठा, लवचिकता इ. वैयक्तिक आकि घटकांच्या वर्तनाचे विश्लेषण केले जाते.
  • समग्रलक्षी अर्थशास्त्र
    समग्रलक्षी अर्थशास्त्रासत आर्थिक प्रश्न किंवा आकि समस्यांचा अभ्यास केला जातो, जसे – बेरोजगारी, समस्या, चलनवाढ समस्या, मंदी समस्या, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार सिद्धांत, चलन सिद्धांत, आर्थिक विकास सिद्धांत, आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत याचा अभ्यास केला जातो.
  • अर्थव्यव्यस्था वर्गीकरण
    जागतिक बँक प्रत्येक जुलै महिन्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण करते, ज्याचा प्रमुख आधार प्रती व्यक्ती उत्पन्न राहते. अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण डॉलरमध्ये पुढीलप्रमाणे केले जाते.
    1) निम्म उत्पन्न वर्ग – 955 किंवा त्यापेक्षा कमी
    2) निम्म मध्यम उत्पन्न वर्ग – 956 ते 3, 895
    3) उच्च मध्यम उत्पन्न वर्ग – 3,896 ते 12,055
    4) उच्च उत्पन्न वर्ग – 12,055 व त्यापेक्षा अधिक
  • भांडवलशाही अर्थव्यवस्था
    ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने घेतले जाते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणेद्वारे निश्चित केल्या जातात, अशा व्यवस्थेला उदारवादी/ भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात.
    1) भांडवलाशाही / अर्थव्यवस्था सर्वप्रथम स्विकार संयुक्त राज्य अमेरिका देशा दुवारे करण्यात आला.
  • उद्दश नफा मिळवणे
    -वैशिष्ट्ये
    1) उत्पादनाच्या साधनांवर – खाजगी मालकी
    2) ग्राहकाच्या मागणीप्रमाणे – वस्तूचा पुरवठा
    3) ग्राहक हाच बाजारपेठेचा – राजा असतो
    4) सरकारचा हस्तपेक्ष – कमीत कमी
    5) किंमत यंत्रणेद्वारे – अर्थव्यवस्था नियंत्रित केली जाते.
    6) उत्पादन, गुंतवणूक व बचतीस – पूर्ण स्वातंत्र्य
    7) अर्थव्यवस्था ओळख – मुक्त तसेच हस्तक्षेपविरहित
    8) वस्तू आणि सेवांचे उत्पादन – खाजगी भांडवलदारांद्वारे
  • भांडवलशाही दोष
    1) खाजगी मालकीमुळे संपत्तीचे केंद्रीकरण होऊन आर्थिक विषमता निर्माण होते.
    2) नफा मिळवणे हा उद्देश असल्यामुळे कामगारांचे शोषण बेरोजगारीची समस्या
    3) चैनीच्या व अधिक नफा मिळवूण देणार्या वस्तूंच्या उत्पादनावर भर
    4) आर्थिक विषमतेमुळे भाववाढीची समस्या निर्माण होणे.
  • फायदे
    1) जलद औद्योगिकरण
    2) दर्जेदार वस्तूंचे उत्पादन
    3) जलद उत्पादन
    4) वस्तूंच्या निवडीस वाव
  • भांडवलशाही अर्थव्यवस्था:
  • या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साथनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणे हा अर्थव्यवस्थेतील उत्पादकाचा मुख्य हेतू असतो. उदा. अमेरिकन संघराज्ये
  • समाजवादी अर्थव्यवस्था:- या अर्थव्यवस्येत उत्पादनाचे घटक एकत्रित रित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात. उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व आणि व्यवस्थापन सरकारकडून केले जाते समाजाचे हित साथावे हा मुख्य हेतू असतो उदा. चीन.
  • मिश्र अर्थव्यवस्था:- या अर्थव्यवस्थेत सार्वजानिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रांचे सह- आस्तित्व असते. उदा भारत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *