ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे होणाऱ्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार संस्थेत शिकाऊ पदावर भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत साइट द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023 निश्चित करण्यात आली आहे.
76 पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. या भरती मोहिमेद्वारे, पदवीधर शिकाऊ (सामान्य प्रवाह) 40 पदे, तंत्रज्ञ शिकाऊ (डिप्लोमा धारक) 30 पदे आणि पदवीधर शिकाऊ (पदवी अभियंता) 6 पदांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे अभियांत्रिकी/तंत्रज्ञान किंवा अंतिम वर्षात पदवी असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने राज्याच्या मान्यताप्राप्त विद्यापीठ / तंत्रशिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा केलेला असावा.
वय मर्यादा
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १४ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
पगार
ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदावर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 9000 आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदावर निवडलेल्या उमेदवारांना रु. 8000 प्रति महिना स्टायपेंड दिले जाईल.
निवड अशी होईल
पदवी/डिप्लोमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेवर उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटचा संदर्भ घेऊ शकतात.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा