1) भारतीय गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळ
स्थापना – 15 एप्रिल 1970
मुख्यालय – नवी दिल्ली
उद्देश – 1) आर्थिकदृष्ट्या कमकुवत व कमी उत्पन्न गटातील व्यक्तींना दीर्घकालीन पतपुरवठा करणे
2) हुडको ही भारत सरकारच्या संपूर्ण मालकीची असून ती केंद्रीय नागरी विकास मंत्रालयांतर्गत कार्य करते.
2) गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ
स्थापना – 1977
साहाय्य – आयसीआयसीआय
स्थापना श्रेय – हसमुखभाई पारेख
मुख्यालय – मुंबई
उद्देश – अल्प व मध्यम उत्पन्न गटातील तसेच विविध सहकारी संस्थांना गृहनिर्माणासाठी दीर्घकालीन कालावधीचा वित्तीय पुरवठा करणे
कार्ये – ग्राहकांना जीवन विमा, साधारण विमा, म्युच्युअल फंडस तसेच बँकिंगच्या सुविधा पुरविणे
3) राष्ट्रीय गृहनिर्माण बँक
ओळख – गृहकर्जा शिखर संस्था
स्थापना शिफारश गट – डॉ.सी.रंगराजन
कायदा – 1987
स्थापना – 9 जुलै, 1988
मालकी – आरबीआय
कार्ये –
1) गृहनिर्माण क्षेत्राला वित्तपुरवठा करणार्या संस्थावर लक्ष ठेवणे,
2) गृहनिर्माण क्षेत्राला वित्तपुरवठा करणार्या संस्थांना पुनर्वित्त पुरवठ्याची सेवा पुरविणे
3) गृहनिर्मितीसाठी जमीन उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक संस्थांना प्रोत्साहन देणे
4) शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ सिडको
कायदा – 1956
स्थापना – 17 मार्च, 1970
मुख्यालय – नवी मुंबई
उद्देश –
1) महानगरातील वाढत्या लोकसंख्यमुळे निर्माण होणार्या राहण्याच्या, आरोग्याच्या, विविध सोयी-सुविधांच्या समस्थांवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन मेट्रो शहराचे नियोजन व निर्मिती करणे
2) लोकांना शाळा, आरोग्य, खेळ, करमणुकीची साधने, सार्वजनिक सोयी-सुविधा, राहण्यासाठी घरे उपलब्ध करुन देणे
5) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण – म्हाडा
कायदा – 1976
स्थापना – 5 डिसेंबर 1977
मुख्यालय – वांद्रे (पू.) मुंबई
म्हाडात विलीनीकृत मंडळ – 1) महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ
2) विदर्भ गृहनिर्माण मंडळ,
3) झोपडपट्टी सुधार मंडळ
4) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ
उद्देश – महाराष्ट्रातील शहरांमध्ये मध्यम व अल्प उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायती दरात निवार्याची सोय करुण देणे.