Breaking
13 Mar 2025, Thu

चलनवाढीचा दर मोजण्यासाठी घाऊक किंमत निर्देशांकांचा भारतामध्ये प्रथम वापर १९४२ मध्ये २३ वस्तूंसाठी करण्यात आला. यासाठी आधार वर्षाचा निर्देशांक १०० समजला जातो. १९४२ चा घाऊक किंमत निर्देशांक हा एक आठवड्यासाठी घोषित करण्यात आला होता, तर यासाठी आधार वर्ष १९ ऑगस्ट, १९३९ चा आठवडा मानण्यात आला होता.

२००४-०५ निर्देशांक
प्रा. अभिजित सेन समितीच्या (२००५) शिफारशीनुसार घाऊक किंमत निर्देशांक शृंखला १४ सप्टेंबर, २०१० पासून लागू करण्यात आली. यासाठी २००४-०५ हे आधार वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. या निर्देशांकामध्ये ६७६ वस्तूंचा स्वीकार
करण्यात आला.

२०११-१२ नवीन निर्देशांक
२०१२ मधील डॉ. सौमित्रा चौधरी कार्यगटाच्या शिफारशीनुसार मे २०१७ मध्ये WPI मापनासाठी २०११ -१२ हे नवीन आधारभूत म्हणून वर्ष स्विकारण्यात आले आहे. या ६९७वस्तुंचे वर्गीकरण तीन गटात करण्यात आले आहे.

चलनवाढीचा दर निर्देशित करण्यासाठी WPI (आधार वर्ष – २०११-०१२) आर्थिक सल्लागार कार्यालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार पूर्वी दर आठवड्याला सादर करीत असे; मात्र आता तो दर महिन्याला काढला जात असून यावर चलनवाढीचा दर वर्ष ते वर्ष पद्धतीने काढला जातो. WPL काढताना फक्त वस्तूचा समावेश केला जातो. त्यामध्ये सेवांचा समावेश केला जात नाही.
१) WPI मापन हे घाऊक बाजारामध्ये उत्पादक आणि मोठ्या व्यापाऱ्यांद्वारे करण्यात येणाऱ्या भूगतानाच्या आधारे करण्यात येते.
२) WPI फक्त वस्तुच्या किमतीचे माप विचारात घेण्यात येते.
३) WPI अंतर्गत प्राथमिक वस्तू, इंधन आणि ऊर्जा आकडेवारी आठवड्याला प्रकाशित करण्यात येते. तर इतर सर्व वस्तूंच्या किमतींची आकडेवारी महिन्याला प्रकाशित करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *