Breaking
13 Mar 2025, Thu

डॉ.अभिजित सेन
डॉ.अभिजित सेन यांच्या अभ्यासानुसार 2004-05 पासून 2009-10 दरम्यान पाच वर्षात देशामध्ये दारिद्रय गुणोत्तर कमी झाले आहे. त्याचबरोबर दारिद्रयरेषेखालील संख्या वाढली आहे.वर्ष 2004-05 म्धये देशातील एकूण 100 कोटी लोेकसंख्येतील 37 कोटी लोकसंख्या दारिद्रयात होती. परंतू 2009-10 मध्ये 121 कोटी लोकसंख्येमधील दारिद्रयसंख्या 38.5 कोटी मापन्यात आली. अशाप्रकारे 2004-05 मध्ये दारिद्रय प्रमाण 37.2 टक्के होते. ते 2009-10 मध्ये 32 टक्के राहिले.

आशियाई विकास बँक –
दारिद्रय रेषा आशियाई विकास बँकेद्वारे ऑगस्ट 2014 मध्ये दारिद्रयरेषेचे पूर्ण परीक्षण करण्यात आले. या बँकेद्वारे 1.51 डॉलर प्रति व्यक्ती प्रति दिवस दारिद्रयमापनाचा आधार मानन्यात आला. 1.51 डॉलर प्रतिव्यक्ती प्रति दिवसानुसार भारतामध्ये गरिबांची संख्या 40.2 कोटी वरुन वाढून 58.4 कोटी झाली.

जागतिक बँक
जागतिक बँकेच्या विश्व विकास निर्देश रिपोर्टनुसार जगामध्ये गरीब लोकांची सर्वाधिक संख्या भारतामध्ये आहे. जगातील 1.3 कोटी गरीब लोकसंख्येचा सर्वाधिक 36 टक्के भारतामध्ये आहे. या गरिबांचे उत्पन्न प्रतिदिवस 1 डॉलर पेक्षाही कमी आहे.

बेरोजगार व्यक्ती म्हणजे
जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये काम करण्याची इच्छा, सामर्थ्य व चालू वेतर दरावर काम करण्याची तयारी असून ही व्यक्तीस काम मिळत नाही, तेव्हा त्यास बेरोजगार म्हटले जाते.

बेरोजगार व्यक्तीमध्ये फक्त कार्यकारी लोकसंख्येचा विचार केला जातो.
कार्यकारी लोकसंख्येचा म्हणजे –
अशी लोकसंख्या अपंग, आजारी, वृद्ध घरकाम करणार्या स्त्रिया, शाळेतील मुले-मुली वगळल्यास जी लोकसंख्या उरते, त्यास कार्यकारी लोकसंख्या म्हटले जाते.

बेरोजगारांमध्ये अपंग, आंध, आजारी व्यक्तींचा समावेश होत नाही.
कारण- त्यांची काम करण्याची इच्छा असते. पण काम करण्याची क्षमता नसते. तसेच स्वतच्या घरी घरकाम करणार्या स्त्रिया, शाळेत जाणारी मुले-मुली, वृद्ध यांनी बेरोजगारी म्हटले जाते. कारण त्यांना कामाचा मोबदला दिला जात नाही. म्हणजेच

बरोजगारीचे प्रकार
शहरी बेरोजगारी
1) घर्षणात्मक बेरोजगारी
2) शैक्षणिक बेरोजगारी
3) संरचनात्मक बेरोजगारी
4) अर्थ / कमी प्रतिीची बेरोजगारी
5) चक्रिय बेरोजगारी
6) तांत्रिक बेरोजगारी

ग्रामीण बेरोजगारी
1) हंगामी बेरोजगारी
2) प्रच्छन्न / छुाी / अदृश्य बेरोजगारी

*बेरोजगारीची कारणे
1) वाढत लोकसंख्या
2) पंचवार्षिक योजनांचे अपयश
3) भांडवलप्रधान यंत्राचा वापर
4) अल्प आर्थिक विकास
5) भारतीय कृषी मागासलेपणा
6) परंपरागत हस्तोद्योगांचा र्हास
7) अयोग्य रोजगार योजना
8) दोषपूर्ण शिक्षणपद्धती

  • बेरोजगारी मापन
    (NSSO (National Sample Survey Office) 1972-73 च्या 27 च्या मोजणीपासून रोजगार व बेरोजगारीविषयक माहिती दर 5 वर्षांनी प्रकाशित करते. .. च्या 2011-12 मधील 68 च्या फेरीत रोजगार व बेरोजगारीचा नववा अहवाल प्रकाशित करण्यात आला. यामध्ये रोजगार व बेरोजगारीविषयक आकडे प्रकाशित करण्यात आलेले आहेत. ते पुढील तीन प्रकार पाहता येतील.

1) सर्वसाधारण स्थिती
बेरोजगारीच्या सर्वसाधारण स्थितीअंतर्गत दीर्घकालीन बेरोजगारीचा अभ्यास केला जातो. अर्थात, या दीर्घ कालावधीत पाहिले जाते की, लोकांना रोजगार उपलब्ध आहे. बेरोजगार आहे की श्रम शक्तीतून बाहेर आहे. अशा र्दीर्घकालीन आकडेवारीचे विश्लेषण करुन बेरोजगारीची व्याख्या केली जाते.

2) चालू दैनिक स्थिती.
चालू साप्ताहिकी स्थितीअंतर्गत मागील सात दिवसांतील कार्यपद्धतीचे विश्लेषण केले जाते. जर या सात दिवसांत एखाद्या व्यक्तीस जर एक तास जरी काम मिळाले असेल, तर त्यास रोजगारी मानले जाते पण जर एखाद्या व्यक्तीला पूर्ण साप्ताहिकीमध्ये एकही तास रोजगार उपलब्ध झाला नाही तर त्यास बेरोजगारी म्हटले जाते.

3) चालू दैनिक स्थिती
चालू दैनिक स्थितीअंतर्गत व्यक्तीच्या प्रत्येक दिवसातील गतिविधीचे परीक्षण केले जाते. यामध्ये व्यक्तीच्या वेळेचाही विचार करुन बेरोजगारीचे माप निश्चित केले जाते. यातून दैनिक बेरोजगारी स्थितीवरील दोन्ही संकल्पनांपेक्षा बेरोजगारीचे सर्वोत्तम मापन स्पष्ट करते.
फिलिप्स वक्र रेषा
फिलिप्स वक्रा मांडणी ए.डब्ल्यू. फिलिक्स.

फिलिप्सच्या मते पेशातील वेतन दर आणि बेरोजगारी वाढीचा दर यांच्यात विपरीत संबंध असतो.
1) पैशातील वेतन दर कमी असतो, तेव्हा बेरोजगारीचा दर वाढतो.
2) पैशातील वेतन दर वाढतो, बेरोजगारीचा दर कामी होतो.

1) पेशातील वेतन दर ओडी तेव्हा बेरोजगारी दर ओएफ
2) पैशातील वेतन दर ओए तेव्हा बेरोजगारीचा दर ओएफ
थोडक्यात, पैशातील वेतर दर ओडी वरुन ओए एवढा वाढल्यास बेरोजगारीचा दर ओएफ वरुन ओसी एवढा कमी होईल.
3) फिलिप्स वक्रानुसार बेरोजगारी कमी करायची असेल तर पैशातील वेतन दरात वाढ करावी लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *