Breaking
13 Mar 2025, Thu

देशातील प्रतिवर्षी दर हजार लोकांमागे मृत्यू पावणार्या बालकांचे प्रमाण म्हणजे मृत्यूदर होय.
मृत्यूदर = मृत्यू पावणार्या बालकांची संख्या

मृत्यूदर प्रकार
1) शिशू मृत्यूदर

एका विशिष्ट वर्षांमध्ये 1000 लोकसंख्येमागे 11 वर्षापेक्षा कमी वयोगटातील शिशू मृत्यूसंख्या व त्याच वर्षांमध्ये जन्मलेल्या
मुलांची संख्या यांचे गुणोत्तर म्हणजे शिशू मृत्यूदर होय.

2) माता मृत्यूदर
माता मृत्यूदर म्हणजे एका वर्षात 1,00,000 जीवित शिशंमागे मृत्यू पावलेल्या मातांची संख्या होय.
1) माता मृत्यू हा मुख्यत गर्भधारणकाळात, प्रसूति दरम्यान आरोग्य सुविधांच्या अभावामुळे, अंधविश्वास या कारणांमुळे होतो.

शिशू मृत्यूदर
1) भारतामध्ये 2012 च्या आकडेवारीनुसार शिशू मृत्यूदर प्रमाण हे एकूण 42.0 होते.
2) ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण 46.0
3) शहरी भागामध्ये 28.0 होते.
4) सर्वात कमी शिशू मृत्यूदर मणिपूर आणि गोवा 11, केरळ 12 होतो.
5) सर्वाधिक शिशू मृत्यूदर मध्य प्रदेश 56.0, उत्तर प्रदेश व ओडिसा 53.0

माता मृत्यूदर
1) जनगणना 2010-12 नुसार माता मृत्यूदर (प्रत्येक 1,00,000 जीवित शिशूंमागे) 179
2) सर्वात कमी माता मृत्यूदर केरळ राज्यात 110
3) सर्वाधिक माता मृत्यूदर उत्तर प्रदेश 517

मृत्यूदर
1) मृत्यूदर आकडेवारी 2012 नुसार ओबडधोबड मृत्यूदर प्रमाण 7.0 होते, तर हेच प्रमाण ग्रामीण व शहरी भागामध्ये अनुक्रमे 7.6 व 5.6 होते.
2) 2011 मध्ये ओबडधोबड मृत्यूदर राज्यांमध्ये राज्यांमध्ये सर्वाधिक ओरिसामध्ये (8.5), तर सर्वात कमी नागालँडमध्ये (3.3) होता.
3) CDR द्वारे ग्रामीण व शहरी किंवा भिन्न भिन्न समाज किंवा स्त्री व पुरुष यांच्यामधील मृत्यूदर प्रमाण प्राप्त करु शकतो.
4) CDR द्वारे विविध देशातील मृत्यूदराच्या प्रमाणाशी तुलना करता येते.

वर्ष मृत्यूदर (प्रति हजार)
1901- 1910 42.6
1951-1960 18.0
1981-1990 14.3
1991-2000 7.4
2001-2010 7.3

मृत्यूदर कमी होण्याची कारणे
1) बालमृत्यूच्या प्रमाणात घट
2) पिण्याचे स्वच्छ पाणी
3) देवी, प्लेग, मलेरिया रोगांचे संपूर्ण निर्मूलन
4) प्रसूतिविषयक सोयीची सर्वाधिक उपलब्धता

मृत्यूदर
भारतात जन्मदाराच्या तुलनेत मृत्यूदरात अधिक वेगाने घट होत आहे. मृत्यूदरात होणारी घट ही लोकसंख्यावाढीचे महत्वाचे कारण आहे. 1891-1900 या दशकात मृत्यूदर 44.4 दर हजारी होता, तो 1951-60 या दशकात 18.0 दर हजारी एवढा कमी झाला तो 1991-2000 या दशकात 7.4 दर हजारी वरुन कमी होऊन 2001-2010 या दशकामध्ये 7.3 दर हजारी एवढा कमी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *