Breaking
14 Mar 2025, Fri

तांबे, सोने, चांदी, निकेल अशा कोणत्याही धातूपासून बनविलेल्या पैशाला धातू पैसा म्हणतात ( उदा. १, २ ,५ व १०, २० रुपयांची नाणी धातू पैसा आहेत.)

१) परिमाण पैसा/पूर्ण किंमत पैसा
परिमाण पैसा हा सिक्यांच्या स्वरूपात असतो, ज्याची एकूण किंमत ही धातूच्या किंमतीबरोबर असते.
उदा वरील धातुची पट्टी ही ५ रु. किंमतीची आहे. या पट्टीचे समान५ भाग पडले असता किंमतीचे नाणे बनविल्यास त्याचे मूल्य धातूच्या किंमतीबरोबर बनते त्यास परिणाम पैसा म्हणतात.

२)प्रतिक/चिन्ह पैसा
प्रतिक पैशाची किंमत ही धातुच्या किंमतीपेक्षा कमी असते.
उदा. वरील धातुची पट्टी ही ५ रु. किंमतीची आहे. या पट्टीचे समान ५ भाग पाडले असता प्रत्येक भागापासून निम्या किंमतीचे नाणे बनविल्यास त्याचे मुल्य धातु च्या किंमती पेक्षा कमी बनते त्यास प्रतिक पैसा म्हणतात.

सहायक पैसा
सहायक पैशाचे काम परिणाम पैसा, प्रतिक/चिन्ह पैशाला मदत करणे हे आहे. ५० पैशांपासून १० रु. पर्यंतचे सिक्के भारतात सहायक पैसा म्हणून कार्य करतात.

कागदी पैसा
कागदी पैसा म्हणजे कागदापासून बनविलेले निश्चित किंमतीच्या अशा नोटा, ज्याना देशातील केंद्रीय बँक किंवा सरकारद्वारे मान्यता देण्यात आलेली असते.

प्रातिनिधीक कागदी चलन
जेव्हा चलन निर्मिती करणारी रिझर्व्ह बँक व सरकार चलनी नोटांचा आधार म्हणून १००% धातूंच्या स्वरूपातील (सोने, चांदी) राखीव निधी ठेवते, तेव्हा त्यास प्रातिनिधिक कागदी चलन असे म्हणतात.

परिवर्तनीय कागदी चलन
जेव्हा चलनाची निर्मिती करणारी यंत्रणा (रिझर्व्ह बँक व सरकार) कागदी चलनाचे परिवर्तन प्रमाणित 1 / ठराविक पैशामध्ये करण्याचे वचन देते, तेव्हा त्यास परिवर्तनीय चलन म्हणतात. असे चलन ठराविक प्रमाणात मौल्यवान धातू साठ्यात तर उर्वरित सरकारी कर्जरोख्यात संरक्षित केले जाते.

अपरिवर्तनीय कागदी चलन
अपरिवर्तनीय कागदी चलनास विधिग्राह्य चलन, विश्वास धिष्ठित चलन म्हणतात.
अपरिवर्तनिय कागदी चलन सरकारच्या सूचनेनुसार किंवा कायद्याने निर्माण केल्याने हे
मागणीनुसार प्रमाणित पैशात अपरिवर्तनीय असते.

पतपैसा
पतपैसा म्हणजे ठेवीदाराने बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी, ज्या केव्हाही काढता येतात किंवा दुसर्या व्यक्तीकडे चेकच्या मदतीने हस्तांतरण करता येते.

प्लास्टिक पैसा
डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड यांना प्लास्टिक पैसा म्हणतात.

स्वीकार्य पैसा
स्वीकार्य पैशाचे दोन प्रकार पडतात.

विधिग्राहा पैसा
विधिग्राह्य पैसा म्हणजे सरकार किंवा जनता दोन्हीही भूगतान आणि कर्ज भरण्याच्या घटक स्वरूपात स्वीकार करतात, कारण त्यास सरकारची मंजुरी प्राप्त होते. यासाठी जनतेला अशा प्रकारचा पैसा अनिवार्य / स्वीकार करावा लागतो.

अविधीग्राहा पैसा
या पैशास सरकार किंवा केंद्रीय बँक नियमांची मंजुरी प्राप्त नसते. उदा- हुंडी, चेक, प्रतिज्ञापत्र इ.

चलनपुरवठा मापन पद्धती
RBI द्वारे देशात चलन पुरवठ्याचे मापन करण्यात येते. चलन/पैशाच्या पुरवठ्याच्या आधारे RBI किंमत पटली आणि व्याजदर यांच्या मध्ये बदल घडवून किंमत पटली स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *