Breaking
18 Oct 2024, Fri

पुण्यात 12वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग CME पुणे ने भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी अधिकृत साइट cmepune.edu.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२३ निश्चित करण्यात आली आहे.

रिक्त पदांचा तपशील
CME पुणे मध्ये या भरती मोहिमेद्वारे एकूण ११९ पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये अकाउंटंट, मेकॅनिक आदी पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मॅट्रिक/१२वी/ग्रॅज्युएशन/आयटीआय आणि मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेमधून संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा.

वयोमर्यादा
या मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असावे. तर पदानुसार अर्जदाराचे वय २५/३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अशी करण्यात येईल निवड
उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी चाचणी / कौशल्य चाचणी / प्रात्यक्षिक चाचणी आयोजित केली जाईल. लेखी परीक्षेतील सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील, ज्यामध्ये सामान्य इंग्रजी, सामान्य जागरूकता, संख्यात्मक योग्यता इत्यादी विषयांमधून प्रश्न विचारले जातील. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

अर्ज कसा करायचा
उमेदवारांनी या भरती मोहिमेसाठी अधिकृत साइट cmepune.edu.in ला भेट देऊन अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२३ पूर्वी अर्ज करावा. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *