Breaking
12 Mar 2025, Wed

प्रत्यक्ष कर
“जेव्हा कराघात व करभार एकाच व्यक्तीवर पडतात, तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात.”
प्रत्यक्ष कर ज्या व्यक्तीवर बसविला जातो, त्यालाच हा कर भरावा लागतो. प्रत्यक्ष कर कराचे संक्रमण होत नाही. उदा,- भांडवली लाभ कर, प्राप्ती कर, वारसा कर इ. प्रत्यक्ष कर आहेत.

अप्रत्यक्ष कर
“ज्या कर पद्धतीमध्ये कराधात एका व्यक्तीवर व कारभार अंतिम व्यक्तीवर पडतो. त्याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात.” अप्रत्यक्ष कराचे संक्रमण होते.
उदा- विक्रीकर , करमणूक कर, पथकर, आयात निर्यात कर.GST इ.

प्रत्यक्ष कराचे फायदे
१) प्रत्यक्ष करामुळे अर्थव्यवस्थेते समानता प्रस्थापित होते.
२) हा कर करदात्याच्या क्षमतेनुसार आकारला जातो.
३) प्रत्यक्ष करात उत्पादकता आढळते.
४) या कराच्या वसुलीचा खर्च कमी असतो.
५) प्रत्यक्ष कर चुकविता येत नाहीत.
६) २००७-०८ प्रत्यक्ष कर का हिस्सा अप्रत्यक्ष करापेक्षा अधिक राहिला.

प्रत्यक्ष कराचे दोष
१) प्रत्यक्ष कराच्या बाबतीत उत्पन्न कमी दाखवून कर चुकविण्याची प्रवृत्ती जास्त असते.
२) कर हिशेबाच्या बाबतीत ही पद्धत क्लिष्ट आहे.
३) कर चुकवेगिरीमुळे काळा पैसा निर्माण होतो. काळा पैसा वाढल्यास भाववाढीस चालना मिळते.
४) प्रत्यक्ष कर प्रामाणिकपणे भरणाऱ्यांची संख्या कमी असते

अप्रत्यक्ष कराचे फायदे
१) अप्रत्यक्ष कराचे दर कमी असतात. त्यामुळे करदात्यांना तो फायदेशीर ठरतो.
२) अप्रत्यक्ष कर लवचिक असतात.
३) अप्रत्यक्ष करापासून शासनाला अधिक उत्पन्न मिळते.
४) अप्रत्यक्ष कराची चुकवेगिरी करता येत नाही.
५) अप्रत्यक्ष करात न्यायता या तत्त्वाचा समावेश होतो.
६)अप्रत्यक्ष कराचा समाज्यावरती प्रतिगामी परिणाम होतो.

अप्रत्यक्ष कराचे तोटे
१) हा कर गरीब-श्रीमंत यांच्यावर एकाच दराने आकारला जातो. त्यामुळे गरिबावर त्याचा अधिक भार पडतो.
२) अप्रत्यक्ष करापासून किती उत्पन्न मिळाले स्पष्ट होत नाही.
३) अप्रत्यक्ष कर वसुलीचा सामाजिक खर्च अधिक असतो.
४) अप्रत्यक्ष कर भरल्याची जाणीव करदात्याला राहत नाही.
५) अप्रत्यक्ष कर वस्तू व सेवांवर आकारण्यात आल्याने वस्तूंच्या किमती वाढतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *