Breaking
13 Mar 2025, Thu

व्यापारी बँका कार्ये
1) प्राथमिक कार्ये
अ) ठेवी स्विकारणे

चालू ठेवी –
चालू खात्यावर किती रक्कम ठेवायची किंवा किती वेळा काढायची याचे बंधन नसते. या खात्यामध्ये ठेवलेल्या रकमेवर अत्यल्प प्रमाणात व्याजदर दिला जातो किंवा काही बँका व्याज देतही नाहीत.

बचत ठेवी –
व्यक्ती आपल्या उत्पन्नापैकी थोडीशी रक्कम बँकेत ठेव म्हणून ठेवतात, याला बचत ठेवी असे म्हणतात. या खात्यावर किती पैसे जमा करायचे याचे बंधन नसते. परंतू काढण्यावर बंधन असते. या ठेवींवर व्याजदर दिला जातो.

ब) मुदती ठेवी
मुदती ठेवीला निश्चित कालावधी ठेवी असेही म्हणतात. एका विशिष्ट कालावधीनंतर या ठेवी लोकांना परत केल्या जातात.
मुदत ठेवी –
या खात्यावर ठेवली जाणारी रक्कम विशिष्ट कालावधी निश्चित करुन ठेवली जाते. या ठेवींना मागणी ठेवींपेक्षा जास्त व्याजदर दिला जातो.
आवर्ती ठेवी –
गरीब व मध्यमवर्गीय लोकांना नियमितरीत्या बचतीची सवय लागावी यासाठी या ठेवी महत्वाच्या असतात. यामध्ये सुरुवातीलाच रक्कम निश्चित न करता ती हप्त्याने भरली जाते. या ठेवींवरही व्याज दिले जाते.

क) कर्ज व अग्रिमे देणे
ठराविक कालावधीसाठी व्याजाने दिल्लया रकमेला कर्जे व अग्रिमे असे म्हणतात. बँका जे कर्ज देतात, त्याचे खालील चार प्रकार पडतात.

1) कर्जे
कर्जे हे ठराविक कालावधीसाठी दिले जाते. यामध्ये मागणी, अल्पकालीन, मध्यम आणि दीर्घ मुदतीची कर्जे असे कर्जाचे वर्गीकरण केले जाते. सात दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी आणि मागणी करताक्षणी मिळणारी कर्जे म्हणजे मागणी कर्जे होय.

2) रोख कर्जे
योग्य तारणाच्या आधारावर व्यापारी बँकाकडून रोख कर्जांच्या स्वरुपात ही कर्जे ग्राहकाला दिली जातात. योग्य प्रमाणात त्यावर व्याजदर आकारला जातो.

3) अधिकर्ष सवलत
अधिकर्ष सवलत म्हणजे योग्य तारणाच्या आधारावर कर्जदार आपल्या कर्ज खात्यातून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत रक्कम काढू शकतो. प्रत्ेक खातेदाराला एक विशिष्ट मर्यादा ठरवून दिलेली असते. या खात्यातून काढलेल्या कर्ज रकमेवरच व्याजाची आकारणी केली जाते.

4) हुंड्या वटविणे
भविष्यामध्ये परतफेड करण्याच्या आश्वासनावर जे कर्ज दिले जाते. त्या कर्जाला हुंड्या वटविणे असे म्हणतात. यासाठी व्यापारी बँका कमिशन आकारतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *