17 फेबु्रवारी 1949 रोजी बँकिग विनिमय कायदा 1949 संमत केला. त्याची कार्यवाही 16 मार्च 1949 पासून करण्यात आली. या कायद्यामुळे आरबीआय ला अधिक व्यापक अधिकार मिळाले, ज्यामुळे व्यापारी बँकाच्या कार्यपद्धतीवर कायदेशीर नियंत्रण ठेवता आले.
देशातील कृषी व ग्रामीण भागातील अधिक विकासासाठी योग्य वित्त पुरवठा व्हावा यासाठी गौरवाला समितीच्या शिफारशीवरुन 1 जुलै 1955 रोजी कायदा 1955 अन्वये इम्पिरियल बँकेचे रुपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले.
पूर्वेकडील बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1959 मध्ये सरकारने (संलग्न कायदा) 1959 संंमत केला. 1963 मध्ये च्या सहयोगी बँकांपैकी दोन बँकांचे विलीनीकरण करुन एकच बँक करण्यात आली. यामध्ये बँक ऑफ बिकानेर व बँक ऑफ जयपूर यांचे विलीनीकरण करुन स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर स्थापन करण्यात आली.
ज्या बँकाच्या ठेवी जून 1969 मध्ये रु.50 कोटींपेक्षा अधिक होत्या. अशा 14 खासगी बँकांचे 19 जुलै 1969 रोजी राष्ट्रयीकरण करण्यात आले.
ज्या बँकांच्या ठेवी 14 मार्च,1980 रोजी रु.200 कोटींपेक्षा अधिक होत्या. अशा 6 खासगी बँकोचे 14 एप्रिल 1980 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आले.