महसूली तूट म्हणजे एकूण महसुली खर्चातून एकूण महसुली उत्पन्न वजा केले असता जे शिल्लक राहते, त्यास महसुली तूट म्हणतात.
महसुली तूट – एकूण महसूली उत्पन्न – एकूण महसूली खर्च
1) महसूली तूटीमध्ये फक्त असेच जमा-खर्च समाविष्ट केले जातात. ज्याद्वारे सरकारच्या चालू उत्पन्न आणि खर्चावर प्रभाव पडतो.
प्राथमिक तूट
जेव्हा राजकोषीय तूटीतून (एकूण खर्चातून कर व करेत्तर उत्पन्न – त्या वर्षातील कर्जवसुली) कर्जावरील व्याज वजा केल्यास जी रक्कम शिल्लक राहते, त्यास प्राथमिक तूट असे म्हणतात. प्राथमिक तूट – राजकोषीय तूट – व्याजाची देणी
१) पारंपारिक अंदाजपत्रक
सार्वजनिक अंदाजपत्रकास पारंपारिक अंदाजपत्रक असे म्हणतात, ज्याचा उद्देश संसदेचे कार्यकारी मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करणे हा आहे.
१) पारंपारािक अंदाजपत्रकात संपूर्ण उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब ठेवला जातो.
२) पारंपारिक अंदाजपत्रकाद्वारे सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवले जाते.
२) निष्पादन अंदाजपत्रक
सरकारी खर्चाचे विभाजन कार्य, परिणाम किंवा लक्ष्य प्राप्तीच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास निष्पादन अंदाजपत्रक असे म्हणतात.
१) निष्पादन अंदाजपत्रकाचा सर्व प्रथम प्रयोग अमेरिकेमध्ये (१९५१) हुअर आयोगाच्या
शिफारशीद्वारे करण्यात आला.
२) निष्पादन अंदाजपत्रकात सरकारी खर्चाच्या उद्दिष्टांऐवजी त्यांच्या उद्देशावर अधिक भर दिला जातो
३) भांडवली अंदाजपत्रक भांडवली
अंदाजपत्रक मध्ये भांडवली जमा आणि भांडवली देणी (भूगतान) यांचा समावेश होतो.
१) भांडवली जमामध्ये बाजार कर्ज, उधार, विदेशी कर्ज, राज्य सरकारला दिलेली कर्ज वसुली व. समावेश होतो.
२) भांडवली देणी यामध्ये यंत्र, मशिनरी, जमीन इ. वर करण्यात येणाऱ्या खर्चाचा समावेश होतो.
४) शून्याधारित अंदाजपत्रक
– शुन्याधारित अंदाजपत्रकाचे जनक पीटर ए. पीहर
– १९८६ मध्ये महाराष्ट्र राज्यात ४२ विभागांसाठी शून्याधारित अंदाजपत्रकाचा प्रयोग केला गेला. (त्यावेळी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, तर वित्तमंत्री सुसुशीलकुमार शिंदे हे होते.) शून्याधारित अंदाजपत्रकात – मागील वर्षाचा खर्च शून्य आहे असे गृहीत धरून पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार केले जाते.यामध्ये प्रत्येक खर्च हा नव्याने मांडला जातो. हा खर्च मांडताना सार्वजनिक सेवांच्या लाभात कोणतीही घट होणार नाही याची दक्षता घेतली जाते.
५) जेंडर अंदाजपत्रक
जेव्हा अंदाजपत्रक मध्ये महिलांसाठी स्वतंत्र विशेष अंदाजपत्रकीय धोरण तयार केले जाते, तेव्हा त्यास जेंडर अंदाजपत्रक असे म्हटले जाते. जेंडर अंदाज पत्रकाद्वारे सरकार महिलांचा
विकास, सशक्तीकरण व कल्याणी संबंधित योजनांसाठी प्रत्येक वर्षामध्ये एक ठराविक धनराशीची (वित्त) व्यवस्था करते.
१) जेंडर अंदाजपत्रकाची सुरुवात १९८२ मध्ये ऑस्ट्रेलिया या देशात करण्यात आली.
२) भारतामध्ये जेंडर अंदाजपत्रकाचे प्रतिपादन २००५-०६ मध्ये पी.चिदंबरम यांनी केले होते.