विकसित अर्थव्यवस्था
1) प्रतिव्यक्ती किंवा राष्ट्रीय उत्पन्न अधिक असणे
2) जीडीपी मध्ये तृतीय क्षेत्राचे प्रमाण अधिक असणे
3) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
4) दारिद्य्रा प्रमाणे कमी असणे
5) जन्मदर आणि मृत्यूदर कमी
6) मानव विकास निर्देशांक अधिक
7) विदेशी व्यापारात आयातीपेक्षा निर्यात अधिक
विकसनशील अर्थव्यवस्था
1) अल्प दरडोई उत्पन्न व राष्ट्रीय उत्पन्न
2) अल्प साक्षरता प्रमाण
3) जन्म आणि मृत्यूदराचे अधिक प्रमाण
4) औद्योगिक मागासलेपणा
5) प्राथमिक उद्योगांना प्राधान्य
6) अधिक लोकसंख्या
7) दारिद्य्रा प्रमाणे जास्त आढळते.
8) बेरोजगारी
मिश्र अर्थव्यवस्था
ज्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी अस्तित्वात असतात, तेव्हा त्या अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था, असे म्हणतात. उदा -भारत.
1) मिश्र अर्थव्यवस्थेचा सर्व प्रथम स्विकार 1948 मध्ये फ्रान्स या देशात करण्यात आला.
2) मिश्र अर्थव्यवस्थेचा सिद्धांत प्रा.केन्स यांच्याद्वारे मांडण्यात आला.
3) भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्विकार करण्यात आला असून खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचे सहअस्तित्व ही तिची ओळख आहे.
वैशिष्ट्ये –
1) खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्राचे सहअस्तित्व
2) उद्योगांचे खाजगी आणि सार्वजनिक असे वर्गीकरण
3) सामाजिक कल्याणास प्राधान्य
4) सरकारी-खाजगी भागीदारी तत्वांचा अवलंब तसेच वस्तू व सेवा किंमत ठरवण्यात सरकारी खाजगी हस्तपेक्ष
फायदे –
1) वस्तू व सेवांचा मुबलक पुरवठा
2) ग्राहकांचे सार्वभौमत्व अबाधित
3) कामगारांचे संरक्षण
4) ग्राहकांच्या मिळवणूकीस आळा
- अर्थव्यवस्थेची क्षेत्रे
-प्राथमिक क्षेत्र
1) कृषी आणि पशुपालन
2) जंगल संपत्ती
3) मत्स्यपालन
4) खाण आणि खनिज उत्पादन - द्वितीय क्षेत्र
1) उद्योग
2) कारखानदारी / विनिर्माण
3) गॅस अणि पाणीपुरवठा
4) वीजनिर्मिती
5) बांधकाम - त्तृतीय क्षेत्र
1) विमा
2) व्यापार
3) वाहतूक आणि दळण-वळण
4) बँकिग
5) सार्वजनिक सेवा
6) साठवण यंत्रणा - चतुर्थ क्षेत्र
1) संशोधन व विकास
2) माहिती तंत्रज्ञान – संस्कृती
3) पुस्तपालन – सॉफ्टवेअर विकास - पंचम क्षेत्र
1) विद्यापीठ – प्रसारमाध्यम
2) विज्ञान
3) बिगर – लाभ संस्था इ.
1) प्राथमिक क्षेत्र – कृषी
2) द्वितीय क्षेत्र – उद्योग
3) तृतीय क्षेत्र – सेवा