Breaking
6 Feb 2025, Thu

10वी, ITI पाससाठी CRPF मध्ये 9212 पदांची मेगाभरती सुरु

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने कॉन्स्टेबल (तांत्रिक आणि व्यापारी) पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 25 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करावा. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 9212 पदे भरली जातील.

पद संख्या
पुरुष – 9105 रिक्त जागा
महिला – 107 जागा
एकूण पदांची संख्या- 9212

शैक्षणिक पात्रता?
1) सीटी/ड्रायव्हर –
केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे आणि भरतीच्या वेळी ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2) सीटी/मेकॅनिक मोटार वाहन – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मोटर मेकॅनिकमध्ये ०२ वर्षे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (पायनियर विंग) सीटी (मेसन / प्लंबर / इलेक्ट्रीशियन) – मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज फी
पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – 100/- रुपये.
SC/ST, महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – कोणतेही शुल्क नाही.

वेतन : पात्र उमेदवारांना 21700 रुपये ते 69100/-इतका पगार मिळेल

महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 27 मार्च
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल

जाहिरात पहा : PDF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *