Breaking
13 Mar 2025, Thu

MPSC च्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

करोना संकटाच्या पार्श्वभूनीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली.
परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.
याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार्‍या राज्यसेवा पूर्व परिक्षेची तारीख बदलण्यात आली होती. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परिक्षा १३ सप्टेबरला होणार होती. नंतर त्यात बदल करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेचे जिल्हा स्तरावर केंद्र बदलून द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *