Breaking
12 Mar 2025, Wed

कर संक्रमण
“जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून कर वसूल केल्यानंतर ती व्यक्ती कराचे ओझे दुसऱ्यावर ढकलायचा प्रयत्न करते. या कर ढकलण्याच्याक्रिय्ला करसंक्रमण असे म्हण जात. थोडक्यात करदाता कराचे ओझे दुसऱ्यावर ढकलून करभारापासून पूर्णत: किंवा अंशत: मुक्त होतो.अशा प्रकारचे संक्रमण प्रत्यक्ष करात शक्य होत नाही, परंतु अप्रत्यक्ष करात ग्रामीण सहज शक्य होते. उदा – संक्रमण के – वस्तूवरील उत्पादन कर, विक्रीकर इ.

कराघात
सरकारद्वारे आकारण्यात आलेला कर ज्या व्यक्तीकडून प्रथम वसूल करण्यात येतो, त्या व्यक्तीवर कराचा आघात होत असतो. थोडक्यात सरकार ज्या व्यक्तीकडून कर आकारते आणि
जी व्यक्ती कर प्रथम भरते, तिच्यावर कराचा आघात झाला असे मानतात. उदा, – प्राप्तिकर.

करभार
ज्या व्यक्तीला सरते शेवटी कराचे ओझे सहन करावे लागते, तिच्यावर करभार पडत असतो. थोडक्यात कर संक्रमणाचा क्रिया पूर्ण झाल्यावर जी व्यक्ती प्रत्यक्षपणे कराची रक्कम
देते, तिच्यावर कारभार पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *