अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदभरतीद्वारे “वरिष्ठ शिपाई, शिपाई”या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 104 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
लक्ष्यात असू द्या या पदभरतीसाठी प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाणार आहेत. आणि संपूर्ण रिक्त पदे भरली जाणार नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011.
मिळणारे वेतन –
वरिष्ठ शिपाई – Rs. 25,500/- ते Rs. 81,100/-
शिपाई – Rs. 21,700/- ते Rs. 69,100/-
दरम्यान, नमूद केल्यानुसार या भरतीसाठी अर्जदाराची वयोमर्यादा ही 56 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे. दरम्यान, या पदभरती बाबत अधिक माहिती हवी असल्यास अर्जदाराने संस्थेच्या अधिकृत वेबसाईट – enforcementdirectorate.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी. तसेच या भरतीसाठी अपूर्ण स्वरूपात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF