कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया लि मध्ये भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर 06 एप्रिल 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा
कोणत्या पदांची होणार भरती
या पदभरतीद्वारे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” या पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. तर या भरतीद्वारे एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वयोमर्यादा :
दरम्यान, या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही 21 ते 30 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क :
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जशुल्क आकारला जाणार असून SC/ST/PwBD उमेदवार यांसाठी रु. 100/- इतका अर्जशुल्क आकारला जाणार असून इतर सर्व श्रेणी उमेदवार यांसाठी रु. 500/- इतका अर्जशुल्क आकारला जाणार आहे.
अर्ज कसा कराल :
या पदभरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्यासाठी https://rb.gy/klap या लिंक वरती क्लिक करा. दरम्यान, या पदभरतीसाठी होणारी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, या भरती बद्दल अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://www.aicofindia.com ला भेट द्यावी.
वेतन :
दरम्यान, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदासाठी Rs. 60,000/- per month इतके वेतन दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत : 06 एप्रिल 2023 आहे.
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.