Breaking
6 Feb 2025, Thu

नोकरीची मोठी संधी.. कर्मचारी निवड आयोगाकडून बंपर भरती घोषित

कर्मचारी निवड आयोगाने SSC CGL परीक्षा 2023 ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार आजपासून आयोगाच्या ssc.nic.in वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मे 2023 आहे. SSC CGL 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना संपूर्ण भरती अधिसूचना वाचण्याचा सल्ला दिला जातो.

उमेदवार 7 मे ते 8 मे 2023 दरम्यान त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा करू शकतात. SSC च्या या भरती मोहिमेअंतर्गत, भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये एकूण 7500 रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदांचा तपशील
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5) आयकर निरीक्षक
6) इस्पेक्टर
7) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8) सब इंस्पेक्टर
9) एक्झिक्युटिव असिस्टंट
10) रिसर्च असिस्टंट
11) डिविजनल अकाउंटेंट
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13) ऑडिटर
14) अकाउंटेंट
15) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18) वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19) कर सहाय्यक
20) सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता :
SSC CGL परीक्षा 2023 मध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही प्रवाहात पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज फी: SSC CGL साठी अर्ज फी रु 100 आहे. महिला उमेदवार, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा:
SSC वेबसाइट ssc.nic.in वर जा.
स्वतःची नोंदणी करा आणि पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी जमा करा.
अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *