एअर इंडियामध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. Air India Air Transport Services Limited (AIATSL), एअर इंडियाची उपकंपनीने विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. एकूण 495 रिक्त जागा आहेत.
AIATSL मधील रिक्त पदांसाठी वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती केली जाईल. अधिक माहिती आणि अर्जासाठी तुम्ही www.aiasl.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
भरल्या जाणाऱ्या पदांचे नाव :
1)कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 80
2) ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 64
3) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 121
4) हँडीमन 230
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: 12वी उत्तीर्ण
पद क्र.3: (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर)+01 वर्ष अनुभव (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
मुलाखतीत कधी जाणार
AIATSL मध्ये भरतीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू 17 ते 20 एप्रिल दरम्यान होणार आहे. उमेदवारांना रिक्त जागा आणि आवश्यक पात्रतेशी संबंधित माहिती तपासल्यानंतरच अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, अर्जाची एक प्रत आणि आवश्यक कागदपत्रे सोबत घ्या. वॉक इन इंटरव्ह्यू एचआरडी विभाग, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम, कॅन्टोन्मेंट, चेन्नई-600043 येथे होईल.
वय मर्यादा
एआयएटीएसएल निली भरतीसाठी उमेदवारांचे वय कमाल २८ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट मिळेल.
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा