जे तरुण निमलष्करी दलात भरती होऊन देशाची सेवा करू इच्छितात ते सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करू शकतात.हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर) आणि हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 मे 2023 असणार आहे.
एकूण जागा – 247
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष आणि संबंधित क्षेत्रात दोन वर्षांचे औद्योगिक प्रशिक्षण. किंवा 60% गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12वी किंवा समकक्ष शिक्षण असणं आवश्यक आहे.
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक): मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष आणि संबंधित क्षेत्रात दोन वर्षांचे औद्योगिक प्रशिक्षण. किंवा 60% गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12वी किंवा समकक्ष शिक्षण असणं आवश्यक आहे.
वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.
वय श्रेणी
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १२ मे २०२३ रोजी १८ वर्षे आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. भारत सरकारच्या नियमांनुसार सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शिथिलता दिली जाईल. अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा