Breaking
6 Feb 2025, Thu

ज्या अंदाजपत्रकामध्ये सरकारचे वार्षिक उत्पन्न (महसूल उत्पन्न + भांडवली उत्पन्न) वार्षिक खर्चापेक्षा (महसूल खर्च + भांडवली खर्च) अधिक असते. तेव्हा त्यास शिलकी अंदाजपत्रक असे म्हणतात.
सूत्र – एकूण उत्पन्न – एकूण खर्च

शिलकी अंदाजपत्रक गुण
1) देशातील भाववाढजन्य परिस्थिती नियंत्रणात ठेवली जाते.
2) कराच्या प्रमाणात वाढ केली जात नाही.
3) भविष्यकालीन तरतूदी करण्यास साध्य ठरते.

शिलकी अंदाजपत्रक दोष
1) राष्ट्रीय उत्पन्न वाढीत घट घडून येते.
2) विविध रोजगारविषयक योजना निर्माण केल्या जात नाहीत.
3) मंदीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण होते.

तुटीचे अंदाजपत्रक
ने “जेव्हा अंदाजपत्रकात एकूण उत्पन्नाच्या न जमेपेक्षा (महसुली उत्पन्न + भांडवली उत्पन्न )
एकूण खर्च (महसुली खर्च + भांडवली खर्च)नास्त असतो, तेव्हा त्यास तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात.
सूत्र – एकूण खर्च > एकूण उत्पन्न

– तुटीचे अंदाजपत्रक गुण
१) देशातील बेरोजगाराची समस्या दूर करुन वस्तूच्या मागणीत वाढ घडवून आणता येते
२) अर्थव्यवस्थेतील उत्पन्न पातळी, मागणी, उत्पादन आणि रोजगार पातळीत वाढ घडून
येते.
३) सरकार देशात उद्योगांसाठी मूलभूत सोयी उपलब्ध करून देते.
४) वस्तूंचा पुरवठा वाढून दीर्घकाळ वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहतात.

तुटीचे अंदाजपत्रक दोष
१) देशात तेजी किंवा भाववाढ होते.
२) देशातील लोकांची बचत व भांडवल संचयाची प्रवृत्ती कमी होते.
३) देशातील चलनाचे मूल्य घटण्यावर होते.
४)देशात भाववाढ, साठेबाजी, भ्राष्टाचार,
विषमता प्रश्न निर्माण होतात.
५) देशात आर्थिक विषमता निर्माण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *