Breaking
17 Oct 2024, Thu

अंदाजपत्रकाची उद्दिष्टे –
1) आर्थिक उन्नतीसाठी वित्तीय साधनामग्रीत वृद्धी करणे
2) सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणे
3) संतुलित प्रादेशिक विकास, पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करणे
4) अर्थव्यवस्थेतील बचतवाढीच्या दरास चालना देणे

अंदाजपत्रकाची तत्त्वे –
1) अंदाजपत्रक संतुलित असावे.
2) रोकड राशी हा अंदाजपत्रकाचा ष्टिकोन असावा.
3) सर्व आर्थिकक्रियांचा समावेश एकाच अंदाजपत्रकात करण्यात यावा..
4) अंदाजपत्रका उत्पन्न व खर्चा अनुमान वास्तविकतेवर आधारित असावेत.
5) ज्या त्या वर्षाचा खर्च त्याच वर्षी करण्यात यावा..

अंदाजपत्रकाचे प्रकार

सममतोल अंदाजपत्रक
ज्या अंदाजपत्रकामध्ये सरकारचे उत्पन्न (महसूली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न) आणि खर्च (महसूली खर्च + भांडवली खर्च) समान असतात. अशा अंदाजपत्रकास समतोल अंदाजपत्रक असे म्हणतात.

समतोल अंदाजपत्रक गुण
1) समतोल अंदाजपत्रक देशाच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम घडवून आणण्याच्या बाबतीत तटस्थ राहते.
2) या अंदाजपत्रकाद्वारे सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवता येते.
3) समतोल अंदाजपत्रकामुळे भाववाढीस आळा घालता येतो.

समतोल अंदाजपत्रक दोष
1) कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारता येत नाही.
2) जेव्हा व्यापरचक्र उद्भवतात तेव्हा अशा धोरणाचा उपयोग होत नाही
3) मंदीजन्य परिस्थितीत अशा धोरणाचा वापर चुकीचा ठरतो.
4) अधिक प्रमाणात रोजगारनिर्मितीस अडथळा निर्माण होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *