Breaking
17 Oct 2024, Thu

कराची अकारणी केंद्र,राज्य,स्थानिक सरकारद्वारे व्यक्तीच्या उत्पन्न, संपत्ती आणि मालमन
वरती केली जाते.कर हे कायदयाने सकतीचे देणे असुन करदात्याद्वारे कोणत्याही प्रत्यक्ष लाभाची
आशा न करता सरकारला दिले जाते. वास्तवात कर हा सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत असतो.कराच्या
मोबदल्यात करदात्याला उपलब्ध करण्यात आलेल्या सेवेचा कर देयतेशी कोणताही संबंध नसतो.
चाणक्य कर प्रशासन म्हणजे -मधमाश्यांनी फुलामधील मध गोळा करणे.

कराची प्रमुख वैशिष्ट्ये
१) कर एक सक्तीचे देणे आहे.
२) कराच्या मोबदल्यात विशेष लाभ प्राप्त होत नाही.
३) कर एक कायद्याने वसुली आहे.
४) कराचा सेवा खर्चाशी कोणताही संबंध नसतो.
५) कर समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने आकारण्यात येतो.

कराचा प्रमुख उद्देश
१) उत्पन्नातील असमानता दूर करणे
२) उत्पन्न प्राप्त करणे
३) अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करणे
४) तेजी-मंदी परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे
५) आयात पर्यायीकरणास चालना देणे

कराची तत्त्वे
१) करात समता व न्याय तत्त्वाचा अंगीकार असावा.
२) करदात्याला कोणता कर व किती भरणार याची निश्चित कल्पना असवी.
३) करवसुलीवरील खर्चात काटकसर या तत्त्वाचा अवलंब करावा.
४) करात सोयीस्कर तत्त्व अवलंबवावे.
५) कर हा उत्पादक असावा.
६) कर आकारणीमध्ये साधेपणा असावा.
७) देशातील करपद्धती कायदेशीर असावी.

५)लवचिकता:
कराच्या दरात लवचिकता असावी अशा लवचिकतेमुळे अर्थव्यवस्थेतील तेजीमध्ये करात वाढ तर मंदीमध्ये करात घट करून अर्थव्यवस्थेत स्थिरता निर्माण करता येते.

६) विविधता :
कराची आकारणी विविध घटकांवरती असावी. उदा आयकर, निगम कर, संपत्ती कर, मालमत्ता कर, खर्च अशातून सरकार विविध करातून अधिक उत्पन्न प्राप्त करता येते.

७)तटस्थता:
क्रांती तत्त्वे / दर निश्चित झाल्यानंतर त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्णय घेताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *