Breaking
13 Mar 2025, Thu


चलनघट चलनवाढीच्या विरुद्ध परिस्थिती मानली जाते. चलनघटीच्या परिस्थितीत पैशाच्या मूल्यात वाढ होते व वस्तू आणि सेवांच्या किंमतीमध्ये घट होते. थोडक्यात, गरजेपेक्षा पैशाचा पुरवठा कमी म्हणजे चलनघट होय.

मुद्रा अपस्फिती
जेव्हा चलनवाढीचे दुष्परिणाम दुर करण्याच्या उद्देशाने मुद्दाम पैशाचा पुरवठा कमी केला जातो. तेव्हा त्यास मुद्रा अपस्फिती म्हटले जाते मुद्रा अपस्फितीचा उद्देश हा मुद्रा प्रसाराचा हानिकारक प्रभाव समाप्त करणे हा असतो.

खालील परिस्थितीमध्ये वस्तू आणि सेवांच्या मूल्यात होणारी घट चलनघट मानली जाते.
1) जेव्हा पैशातील उत्पन्न कमी होते, परंतू उत्पादनाच्या एककात वाढ होते.
2) जेव्हा पैशातील उत्पन्न स्थिर राहते, परंतू उत्पादनाच्या एककात वाढ होते.
3) जेव्हा पैशातील उत्पन्न कमी होते, परंतू उत्पादनाचे एकक पूर्ववत स्थिर राहते.
4) जेव्हा पैशातील उत्पन्न आणि उत्पादन दोन्हीमध्येही वृद्धी होत राहते, परंतू पेशातील उत्पन्नाच्या तुलनेत उत्पादन अधिक वाढत राहिते तर,
5) जेव्हा पैशातील उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही कमी होत राहिले, परंतू पैशातील उत्पन्न उत्पादनाच्या तुलनेत अधिक प्रमाणात वाढत राहिले तर चलनघटीचे कारण पैशातील उत्पन्न आणि उत्पादनाचे एकक यामध्ये असंतूलन उत्पन्न होणे हे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *