Breaking
6 Feb 2025, Thu

१) मतगणी प्रेरित चलनवाढ
वस्तूआणि सेवांची जलद वाढणारी मागणी आणि त्याचप्रमाणात जलद वाढणारा पैशाचा हस्तक्षेप या कारणाने वाढणारी किंमत म्हणजेच मागणी प्रेरित चलनवाढ होय.
२) खर्च प्रेरित चलनवाढ
वस्तूचा उत्पादन खर्च वाढल्याने जेव्हा वस्तूंच्या किमती वाढल्या जातात, तेव्हा त्यास खर्च प्रेरित चलनवाढ असे म्हणतात.
३) पत / साख चलनवाढ
उदार कर्ज धोरणाच्या मोबदल्यात व्यापारिक बँकेद्वारे अधिक पतपैसा निर्माणामुळे उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे पत / साख चलनवाढ होय.
४) अंदाजपत्रकीय चलनवाढ
अंदाजपत्रकीय तूट कमी करण्यासाठी तुटीचा अर्थभरण्या अंतर्गत नवीन नोटा छापल्यामुळे पुरवठ्यात वाढ करतात, ज्यामुळे किमतीमध्ये वाढ होते, यास अंदाजपत्रकीय चलनवाढ असे म्हणतात.
५)खुली चलनवाढ
खल्या चलनवाढीमध्ये समाजातील वाढत जाणाऱ्या उत्पन्नातील उपभोगावर नियंत्रण लावले जात नाही.
६) अवमूल्यन चलनवाढ
चलन अवमूल्यन मुळे निर्यात वाढणे आणि देशांतर्गत पुरवठा कमी झाल्याने वस्तूच्या किंमत वाढू लागतात, त्यास अवमूल्यन सहित चलनवाढ असे म्हणतात.
७) युद्धकालीन चलनवाढ
जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा देशहितासाठी सरकारला अधिक पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे चलनात पैशाचे प्रमाण वाढते, तेव्हा त्यास युद्धकालीन चलनवाढ म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *