राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत भरती जाहीर झाली असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत विधी अधिकारी (गट-ब) / Legal Officer (Group-B) 16 ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, या भरतीद्वारे एकूण रिक्त पदे 37 भरली जाणार आहेत.
आवश्यक पात्रता :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावी,तसेच त्याला विधी अधिकारी, गट-ब या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
या पदभरतीसाठी अर्जदाराची वयोमर्यादा ही 27 एप्रिल 2023 रोजी, 35 ते 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
वेतन
20,000/- रुपये ते 28,000/- रुपये.
अर्ज करण्याची मुदत
या पदभरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. दरम्यान, यासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 27 एप्रिल 2023 आहे. (Excise Department Of Maharashtra)
दरम्यान, या भरतीसाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, दुसरा मजला, जुने जकातघर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001. हा आहे. तसेच या भरतीबाबत अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत संकेतस्थळ : http://stateexcise.maharashtra.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा