Breaking
14 Mar 2025, Fri

देशातील 1000 पुरुषांमागे असलेल्या स्त्रियांच्या संख्येस लिंगगुणोत्तर असे म्हणतात

वर्ष लिंगगुणोत्तर
1951 946
1961 941
1971 930
1981 934
1991 927
2001 933
2011 943

1) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात सर्वांत जास्त लिंगगुणोत्तर 1951 मध्ये 946, तर सर्वात कमी लिंगगुणोत्तर 1991 मध्ये 927 होते.
2) जनगणना 2011 नुसार देशात एकूण पुरुष संख्या 62,32,70,258 कोटी आणि स्त्री संख्या 58,75,84,719 कोटी आहे, या प्रमाणानुसार 2011 मध्ये स्त्री पुरुष गुणोत्तर 943 : 1000 होते, तर सर्वात कमी लिंगगुणोत्तर दीव-दमणमध्ये 618 : 1000 होते.

शिशू लिंगगुणोत्तर
1) भारतामध्ये लिंगगुणोत्तर काढताना शिशू लिंगगुणोत्तरही काढले जाते. शिशू लिंगगुणोत्तर 0-6 वयोगटातील वेगळे काढले जाते.
2) जनगणना 2011 नुसार देशात 0-6 वयोगटातील लिंगगुणोत्तर 918
3) 0-6 वयोगटात राज्यात सर्वाधिक लिंगगुणोत्तर अरुणाचल प्रदेशात 972
4) राज्यात सर्वात कमी लिंगगुणोत्तर हरियाणा राज्यात 834
5) 0-6 वयोगटातील लिंगगुणोत्तरासंदर्भात केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास सर्वाधिक लिंगगुणोत्तर अंदमान – निकोबारचे 968
6) केंद्रशासित प्रदेश सर्वात कमी लिंगगुणोत्तर दिल्लीचे 871

लिंगगुणोत्तर कमी असण्याची कारणे
1) स्त्रियांना दुय्यम स्थान
2) मुलगा कुटुंबाचा व म्हातारपणाचा आधार
3) मुली परक्याचे धन
4) सामाजिक प्रथा, रुढी, परंपरा इ.
5) मुलगा वंशाचा दिवा

न्यूनतम लिंगगुणोत्तर असलेली राज्ये
1) हरियाणा (879)
2) जम्मू-काश्मीर (889)
3) सिक्कीम (890)
4) पंजाब (895)

धर्मनिहाय स्त्री-पुरुष
प्रमाणग्रामीण / शहरी

हिंदू 947/ 921
मुस्लीम 958/ 942
खिश्खन 1008/1046
शीख 905/898

धर्मनिहाय लिंगगुणोत्तर (0 ते 6 वर्ष)
हिंदू – 913
मुस्लिम – 943
खिश्चन – 958
शीख – 828
बौद्ध – 933
जैन – 889
इतर – 974
एकूण – 918

धर्म निहाय लिंगगुणोत्तर
हिंदू – 939
मुस्लीम – 951
खिश्चन – 1,023
शीख – 903
बौद्ध – 965
जैन – 954

सर्वाधिक लिंगगुणोत्तर राज्य
1) केरळ (1084)
2) तामिळनाडू (996)
3) आंध्र प्रदेश (993)
4) छत्तीसगड (991)

1) केंद्रशासित प्रदेशांत सर्वाधिक लिंगगुणोत्तर पाँडेचरीम्धये (1037), तर न्यूनतम लिंगगुणोत्तर दीव दमनमध्ये (618) आहे.
2) 0-6 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये लिंगगुणोत्तर 918 (1000 मुलांमागे) आहे, यामध्ये सर्वाधिक लिंगगुणोत्तर मिझोराम (971) राज्यात, तर सर्वात कमी लिंगगुणोत्तर हरियाणा (830) राज्यात आहे.
3) 0-6 वयोगटात केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक लिंगगुणोत्तर अंदमान-निकोबारमध्ये (966) आहे, तर सर्वात कमी लिंगगुणोत्तर दिल्लीमध्ये (866) आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *