केंद्रीय अप्रत्यक्ष कर
सीमा शुल्क
१ सीमा शुल्क केंद्रीय यादीतील विषय क्रमांक ८३ असून सीमा शुल्क कायदा १९६२ लागकरण्यात आला आहे.सीमा शुल्काची आकारणी केंद्र सरकारद्वारे केली जाते.
२) परंतु याद्वारे मिळणारे उत्पन्न राज्यांमध्ये वितरित केला.
३) सीमा शुल्क आयात आणि निर्यात व लावले जाते.
४) शुल्क वस्तूच्या मूल्यानुसार/वैशिष्ट्यानुसार आकारण्याची येते.
५) जेव्हा शुल्क मूल्यानुसार आकारले जाते, तेव्हा शुल्क दर वस्तूच्या मूल्यावर अवलंबून असतो आणि हे प्रगतिशील असते.जेव्हा शुल्क वैशिष्ट्यानुसार आकारण्यात येते, तेव्हा ते वस्तूचे घटक, संख्या, आकारानुसार लावले जाते व हे प्रतिगामी असते.
६) WTO करारानुसार बिगर-कृषी उत्पादनावर सीमा शुल्क १०% दराने आकारण्यात येते.
७) सीमा शुल्क पुढील उद्देशाने आकारण्यात येते.
A) विदेशी स्पर्धापासून देशी उद्योगांना संरक्षण देण
B) सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे
केंद्रीय उत्पाद शुल्क
१) केंद्रीय उत्पादन शुल्क वस्तूच्या उत्पादनावर आकारल जाते.
२) केंद्रीय उत्पादन शुल्काची विभागणी केन्द्र व राज्य कैली जाते. सरकार या दोन्हीमध्ये वित्त आयोगाच्या शिफारशीद्वारे
३) राज्यघटनेअंतर्गत केंद्र सरकारला दारू, अफिम, गांजाइ. मादक पदार्थ व औषधे सोडून इतर सर्व प्रकारच्या वस्तूंवरकेंद्र सरकार उत्पादन शुल्क आकारते.
४) उत्पादन शुल्कासंदर्भात प्रथम सुधारणा १९८१ मध्ये MAN VAT (Manufacturing Value Added Tax) सुरू करण्यात आला. त्यानंतर १९८६ मध्ये Mod VAT (Modified Value Added Tax ) सुरू करण्यात आला. याअंतर्गत उत्पादनाच्या दोन्ही स्तरामधील मूल्य वृद्धीदर कर आकारण्यात आला.
५)१ एप्रिल, २००० पासून CEN VAT ( Central Added Tax ) ची आकारणी उत्पादन शुल्काची वेगवेगळे दर एक समान करण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
६) CEN VAT ची आकारणी १४% दराने केली
सेवा कर
१) सेवा कर आकारण्याची शिफारस सर्वप्रथम चेलय्या समिती (१९९१) द्वारे करण्यात आली.
२) भारतामध्ये १ जुलै १९९४ मध्ये सेवा कर सुरू करण्यात आला असुन पहिल्यादा तीन सेवांवर टेलिफोन, साधारण विमा, शेअर दलाली सेवा कर ५%दराने आकारण्यात आला.
३) सेवा कराची आकारणी केंद्र सरकारद्वारे मात्र केंद्र/राज्य सरकार द्वारा गोळा केली जाते.
४) सध्या ३८ सवा या सेवा करातून वगळण्यात आला देशात सध्या १२० सेवांवरती सेवाकरआकारला जात
५) अंदाजपत्रक २०१५-१६ पासून १४.५%’ दराने सेवा कराचीआकारणी करण्यात येते.
६) २०१५-१६ नतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन विमा योजना प्रधानमंत्री जनधन योजना आणि अटल पेन्शन, योजना याअतर्गत अनुदान स्वरूपात देण्यात येणाऱ्या
सेवांवर सेवा करात सूट देण्यात आली आहे.
केंद्रीय विक्रीकर
१ केंद्रीय विक्री कराची सुरुवात १९८ मध्ये करण्यात आली असुन हा दोन राज्यात होणाऱ्या व्यापाराव आकारण्यात येणार कर आहे.
२ केंद्रीय विक्री कराची आकारणी केंद्राद्वारे केली जाते, परंतु या कराचा संपूर्ण वसुली राज्य सरकार द्वारे केली जातअसूनयातून प्राप्त होणारा संपूर्ण महसूल राज्यांना दिला जातो.
३ केंद्रीय विक्री कराची आकारणी ४% दराने करण्यात येते.
४) विक्रीकराएवजी VAT लागू केला.
५) विक्रीकर दोष तो प्रतिगामी आहे.