1) इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड (महाराष्ट्र)
पोस्टाची तिकीटे, सरकारी स्टॉम्प, पोस्टाची इतर कागदपत्रे, बँक चेक, बॉण्ड, राष्ट्रीय बचत पत्र, पासपोर्ट, इंदिरा विकासपत्र, किसान विकास पत्र इत्यादींची छपाई येथे केली जाते.
2) बँक नोट प्रेस- देवास (मध्यप्रदेश)
बँक नोट प्रेस, देवास येथे रु. 20,50, 100, 200, 500 च्या नोटा छापल्या जातात. त्याचबरोबर बँक नोट प्रेस देवास येथे शाईचा कारखाना आहे.
3) करन्सी नोट प्रेस, नाशिक (महाराष्ट्र-1991)
रु.10, 50, 100, 500, 2000 च्या बँक नोट छपाई व त्यांचा पुरवठा करणे
4) सिक्युरिटी प्रिंटींग प्रेस हैदराबाद-1982
दक्षिण राज्यांची पोस्टाची, कागदपत्रांची गरज पूर्ण करणे व संपूर्ण देशात केंद्रीय उत्पादन शुल्क स्टॅम्पची मागणी पूर्ण करणे
5) भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेड यांअंतर्गत
1) आधुनिक करन्सी नोट प्रेस, म्हैसूर (कर्नाटक)
2) साल्बोनी (पं.बंगाल) या ठिकाणी नियंत्रित करन्सी नोटा छापल्या जातात.
6) सिक्युरिटी पेपर मिल, होशंगाबाद (मध्यप्रदेश) (1967-68)
बँक आणि करन्सी नोट कागद, स्टॅम्पपेपर छपाई पेपरचे कागद उत्पादन करण्यासाठी 1967-68 मध्ये ही मिल स्थापन करण्यात आली.