Breaking
6 Feb 2025, Thu

राज्य सरकारचे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष कर

कृषी उत्पन्न कर
१) कृषी उत्पन्नावर कर आकारणी राज्य सरकारद्वारे केली जाते.
२) शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरील करास शेती उत्पन्न कर असे म्हणतात.
३) सध्या बिहार, केरळ, कर्नाटक, ओडिसा, आसाम, पं. बंगाल, तामिळनाडू या राज्यांत कृषी उत्पन्नावर या कराची आकारणी करण्यात येते.
४) महाराष्ट्र राज्यात कृषी उत्पन्नावर कराची आकारणी केली जात नाही.

राज्य विक्री कर
१) राज्यांतर्गत वस्तूंच्या विक्रीवर जो कर आकारण्यात येतो, त्यास राज्य विक्री किंवा खरेदी कर असे म्हणतात.
२) विक्री कराची आकारणी केंद्र सरकार द्वारे केली जाते, तर अशा कराची वसुली राज्य
सरकार द्वारे केली जाते.

मनोरंजन कर
१) मनोरंजन कराची आकारणी ही राज्य सरकार द्वारे केली जाते.
२) मनोरंजन कर हा चित्रपट, सर्कस, नाटक इ. पाहणाऱ्यांवर आकारण्यात येतो.
३) हा कर राज्य सरकार चित्रपट, सर्कस, नाटक इ. च्याव्यवस्थापकाद्वारे वसूल करते.

शेती महसूल
१) शेती महसूल भूधारकावर त्यांच्या शेतीच्या आधारावर आकारला जातो.
२) राज्यांमध्ये शेती महसूल खालील प्रकारे निश्चित केला जातो.
A) शुद्ध संपत्तीच्या आधारावर
B) शुद्ध उत्पादनाच्या आधारावर
C) व्यावहारिक आधारावर
३) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्य सरकारचे महसूलाचे एकमात्र साधन हे शेती महसूल होते.

स्टॅम्प व रजिस्ट्रेशन शुल्क
१) स्टॅम्प एक खरेदी साधन आहे, जे त्यावरील शिक्कामूर्त किम तीवर राज्य सरकारद्वारे विकले जातात. यास स्टॅम्प शुल्क म्हणतात.
२) स्टॅम्प शुल्काचे दोन प्रकार आहेत.
A) न्यायालय स्टॅम्प – न्यायालय स्टॅम्पचा वापर कोर्ट फी व इतर फौदजारी खटला/ केसच्या उपयोगासाठी केला जातो.
B) बिगर-न्यायालय स्टॅम्प – बिगर-न्यायालय स्टॅम्प बिल हुंडी व इतर प्रपत्राच्या कामामध्ये वापरले जाते.
३) स्टॅम्प शुल्काची आकारणी राज्य सरकारद्वारे केली जाते.

राज्य उत्पादन शुल्क
१) राज्य उत्पादन शुल्काची आकारणी व वसुली राज्य सरकारद्वारे केली जाते.
२ राज्य सरकार पुढील वस्तूवर उत्पादन शुल्क आकारते – अल्कोहोल, दारू, गुंगी आणणारी
औषधे, अफू-गांजा व इतर औषधे इ.

मोटार वाहन कर
१)मोटार वाहन कराची आकारणी आणि वसुली राज्य सरकारद्वारे केली जाते.
२) मोटार वाहन कर राज्य सरकारद्वारे इंजिनावर चालणाऱ्या गाड्यांवर आकारण्यात येतो.
3) देशामध्ये मोटार वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने अशा कराच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *