१) कलम २४६ ए – यानुसार केंद्र व राज्यांना GST विषयक कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. यानुसार CGST, IGST आणि UTGST संबंधित कायदे करण्याचा अधिकार संसदेला तर
SGST विषयक कायदे करण्याचा अधिकार संबंधितराज्य विधान मंडळाला देण्यात आला.
२) कलम २६९ ए यानुसार आंतरराज्यीय (IGST)व्यापारावरील GST ची आकारणी व वसुली करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आला.
३) कलम २७९ ए – यामध्ये GST परिषदेच्या स्थाप नेची तरतूद करण्यात आली आहे
* दुरुस्त करण्यात आलेली कलम
१) कलम २७० – यानुसार केंद्र सरकारने वसूल केलेल्या GST ची विभागणी केंद्र व राज्यांमध्ये करण्याची तरतूद केली आहे.
२) कलम २७१ – यानुसार संसदेला GST वर अधिभार आकारण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
३) १०१ व्या घटनादुरूस्तीमुळे सातव्या अनुसूच तील संघसूची आणि राज्य सूचीतील विषयांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्र सूचीत करांच्या विषयांची संख्या १४ वरून १२ तर राज्यसूचीतील करांच्या विषयांची संख्या १९ वरून १७ वर वर आली आहे.
१०१ व्या घटनादुरुस्ती कायद्याने (२०१६) घटनेत झालेले बदल समाविष्ट करण्यात आलेली नवीन कलमे
![](https://mpsconlineacademy.com/wp-content/uploads/2020/08/New-Project-1-3.jpg)