Tuesday, June 18, 2024

भारतीय नाणे बाजार

अल्पकालीन निधींची देवाण -घेवाण करणार्या वित्तीय व्यवस्थेला भारतीय नाणे बाजार म्हणतात. नाणे बाजारातील कर्ज व्यवहार अल्पमुदतीसाठी म्हणजे 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी केले जातात. कृषीसाठी मात्र हा कालावधी 15 ते 18 महिन्यापर्यंतचा असू शकतो.

नाणे बाजार प्रकार
असंघटित क्षेत्र

1) सावकार – ग्रामीण भागातील व्यापारी
2) नातेवाईक, मित्र- मोठे जमीनदार
3) सराफी पेढीवाले
4) बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो.

संघटित क्षेत्र
1) व्यापारी बँका- सार्वजनिक क्षेत्रातील
2) खाजगी क्षेत्रातील – सहकारी क्षेत्रातील
3) परकीय क्षेत्रातील बँका

1) 18 च्या शतकात प्रथम ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई आणि कोलकतामध्ये एजन्सी गृह म्हणून एक संस्था स्थापन केी.
2) भारतातील पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्थान 1770 मध्ये अलेक्झांडर अँड कंपनीने कोलकात्याला स्थापन केली.
3) 19 व्या शतकामध्ये बँकांची गरज भासू लागल्यावर ईस्ट इंडिया कंपनीने प्रेसिडेन्सी बँका स्थापण्याचा निर्णय घेतला.
4) 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाची पहिल्या प्रेसिडेन्सी बँकेची स्थापना करण्यात आली या बँकेचे 1809 प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल मध्ये रुपांतर करण्यात आले. जिला सर्वप्रथम नोटा छापण्याचा अधिकार 1823 मध्ये व 1839 मध्ये शाखा उघडण्याची अनुमती देण्यात आली. बँक ऑफ बाँम्बे या नावाने 1840 मध्ये दुसरी तर बँक ऑफ मद्रास या नावाने 1843 मध्ये तिसरी प्रेसिडेन्सी बँक स्थापन करण्यात आली. 1921 मध्ये बँक ऑफ बंगाल बँक ऑफ बाँम्बे आणि बँक ऑफ मद्रास या तिन्ही प्रेसिडेन्सी बँकांचे एकत्रीकरण करुन इम्पिरियल बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली.
6) 1881 मध्ये अलाईस ऑफ शिमला आणि अवध कमर्शिअल बँकेची स्थापना करण्यात आली. अवध कमर्शिअल बँक ही भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली पहिली बँक होती.
7) 1894 मध्ये पूर्णपणे भारतीय मालिकीची पहिली बँक पंजाब नॅशनल बँक या नावाने स्थापन केली. ही बँक स्थापन करण्यामध्ये लाला हरकिशन यांची महत्वपूर्ण भूमिका होती.
8) 1906 मध्ये बँक ऑफ इंडिया, 1908 मध्ये बँक ऑफ बडोदा 1911 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि 1913 मध्ये बँक ऑफ म्हैसूरची स्थापना करण्यात आली.
9) 1906-1913 मध्ये एकूण 98 बँका स्थापन झाल्या होत्या. परंतू महायुद्धाचा परिणाम, गैरव्यवस्थापन, नियमांचे पालन न करणे यामुळे 1913-17 दरम्यान, 87 बँका बुडाल्या.
10) 1934 मध्ये कायदा, 1934 संमत करण्यात आला.
11) 1934 कायद्यांतर्गत 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून स्थापना करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles