Saturday, July 27, 2024

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक

-अग्रणी बँक योजना
LBS स्थापना शिफारस
१)राष्ट्रीय पत समिती अभ्यासगटची स्थापना डॉ. धनंजय गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या समितीने १९६९ मध्ये अहवाल सादर केला. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी आपला शाखा
विस्तार करण्यासाठी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्राची निवड करून ‘क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन’ लागू करण्याची शिफारस केली.
२) बँक व्यावसायिकांची समिती या समितीची स्थापना श्री. एफ. के. एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या समितीच्या स्थापनेचा मुख्य उद्देश गाडगीळ समितीने केलेल्या
शिफारशींचा अभ्यास करणे . नरिमन समितीने गाडगीळ यांची ‘क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन’ स्वीकारून अग्रणी बँक योजना तयार केली. या समित्यांच्या शिफारशींवरून डिसेंबर १९६९ मध्ये RBI ने अग्रणी
बँक योजनेचा स्वीकार केला. प्रत्येक बँकेला एक जिल्हा दत्तक देऊन त्या बँकेला त्या जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून दर्जा देण्यात
उद्देश- ग्रामीण भागामध्ये बँकांचा शाखा विस्तार करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली.या समित्यांच्या शिफारशींवरून डिसेंबर १९६९ मध्ये RBI ने अग्रणी बँक, योजनेचा स्वीकार केला. ही योजना देशातील ३३८ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आली. या सर्व जिल्ह्यांमध्ये बँकांचा विकास करण्यासाठी , तिच्या सर्व सहयोगी बँका, १४ राष्ट्रीयीकृत बँका व ३ खासगी बँकांना या जिल्हांचे
पालकत्व दिले. प्रत्येक बँकेला एक जिल्हा दत्तक देऊन त्या बँकेला त्या जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून दर्जा देण्यात आला. प्रत्येक जिल्ह्याची अग्रणी बँक ही त्या जिल्हाच्या विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करून तो राबवण्याची महत्त्वाची जबाबदारी अग्रणी बँकेवर होती.
ही अग्रणी बँक योजना मुंबई, कोलकाता, चेन्नई ही महानगरे आणि दिल्ली, गोवा व पाँडेचेरी या प्रदेशांमध्ये राबविण्यात आली नाही.

अग्रणी बँकेची कार्ये
१) सर्वप्रथम जिल्हाचे सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी पतपुरवठ्याची किती गरज आहे हे ठरविणे.
२) आर्थिक पतपुरवठ्याची कुठे गरज आहे हे ठरवून तिथे बँकेच्या शाखा स्थापन करणे.
३) जिल्हा सल्लामसलत समित्यांची स्थापना करून जिल्ह्यातील सर्व व्यापारी, सहकारी बँका, विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व वित्तीय संस्था आणि जिल्हा प्रशासनामध्ये समन्वय साधणे.
१) एप्रिल १९८९ मध्ये भारत सरकारच्या सूचनेनुसार अग्रणी बँक योजनेअंतर्गत “क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन” लागू करण्यात आला. या योजनेअंतर्गत प्रत्येक बँक शाखा १५ ते २५ गावांच्या सेवा क्षेत्राच्या आर्थिक विकासासाठी, त्यांच्या कर्जाची गरज भागविण्यासाठी प्रयत्न करेल.
२) २०१३ पर्यंत अग्रणी बँक योजना ही ग्रामीण आणि निम शहरी भागामध्ये कार्य करत होती; परंतु मे २०१३ मध्ये अग्रणी बँक योजना शहरी भागातही लागू करण्याचे आदेश दिले.
उषा थोरात समिती
अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी २००९ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चाधिकारी समितीची स्थापना केली. २० एप्रिल २००९ रोजी या समितीने आपला अहवाल सादर केला.

शिफारशी
१) ही योजना यशस्वीरीत्या चालवण्यासाठी खासगी बँकांवर महत्त्वाची जबाबदारी देणे.
२) २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावामध्ये ही योजना राबवणे.
– संपत्तीचे वर्गीकरण
1) प्रमाणित किंवा निष्पादित संपत्ती ज्या कर्ज अग्रिमांवरील व्याज निश्चित कालावधीमध्ये (90 दिवसांपर्यंत प्राप्त होते, त्याला प्रमाणित संपत्ती म्हणतात.
2) अप्रमाणित संपत्ती किंवा अनिष्पादित संपत्ती ज्या कर्ज अग्रिमांवरील व्याज 90 दिवसांनंतरही मिळत नाही, त्या संपत्तीचा समावेश अप्रमाणित/अनिष्पादित संपत्तीमध्ये कंला जातो.

संपत्तीची तरतूद
जोखीमभारित संपत्तीपासून बँकेचे संरक्षण करण्यासाठी सर्व कर्जांवर निधिीची तरतूद करण्याचे बंधन बँकांना घातलेले असते.

भांडवल पर्याप्तता गुणोत्तर
भांडवल-जोखीमभारित गुणोत्तर म्हणजे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर होय. अतिनुकसानीमुळे
येणाऱ्या संकटांचा बँका कशाप्रकारे सामना करू शकतात हे समजण्यासाठी बँकांच्या भांडवल
पर्याप्ता गुणोत्तराचा उपयोग होतो.
१९९२ पासून रिझर्व्ह बँक्ने व्यापारी बँकांवर भांडवल पर्याप्ततेचे निकष लागू केले. सुरुवातीला हे
प्रमाण ८% होते. २००० पासून जोखीमभारित गुणोत्तराचे किमान ९% भांडवल पर्याप्तता गुण
त्तर राखण्याचे बंधन घालण्यात आले आहे.जोखीमभारित संपत्तीचे प्रमाण मोजण्यासाठी बँकेच्या
विविध प्रकारच्या कर्जाना ० ते १०० पर्यंतचा जोखीमभार दिला जातो व त्यावरून जोखीमभारित ।
संपत्ती काढली जाते. बँकांकडे असणाऱ्या भांडवलाचे वर्गीकरण दोन प्रकारांमध्ये केले जाते.
१) Tier -I
A संकटाच्या वेळी लगेच उपलब्ध होणाऱ्या भांडवलाचा यामध्ये समावेश होतो. म्हणून या भांडवलाला बँकेचे प्राथमिक भांडवल तसेच गाभा भांडवल असेही म्हणतात.
यामध्ये खालील भांडवलांचा समावेश होतो.
– सामायिक भागभांडवल
– राखीव वैधानिक निधी
– संपत्तीच्या विक्रीतून प्राप्त होणारा जास्तीचा राखीव निधी
– जाहीर केलेला भांडवली साठा (राखीव निधी)
B) भांडवल पर्याप्तता मिळवण्यासाठी भांडवलाचे जोखीम भारीत संपत्तीशी असलेले प्रमाण काढावे लागते.
C) भांडवल पर्यप्तमुळे बँक कुठलेही संकट आले तरी व्यवहार करण्यास सक्षम आहे हे समजते.

R) Tier -II

A) यामध्ये खालील भांडवलाचा समावेश होतो.
-जाहीर न केलेला भांडवली साठा (राखीव निधी)
-पुनर्मूल्यांकन भांडवली साठा (राखीव निधी)
-कर्ज मालमत्तांवरील तरतूद
B) या भांडवलाला बँकेचे दुय्यम प्रतीचे भांडवल असे म्हणतात. तसेच याला पूरक भांडवल असेही
म्हणतात.
C) – भांडवल पर्याप्तता मिळविण्यासाठी – चे जोखीम भारीत संपत्तीचे असलेले प्रमाण काढावे
लागते.
D) भांडवल पर्याप्ततेमुळे बँक कुठलेही आर्थिक संकट आले तरी ती त्याचे सुरुवातीचे परिणाम सहन
करू शकते हे समजते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles