Saturday, July 27, 2024

बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट

१) स्थापना-१७ मे, १९३० रोजी १० देशांच्या मध्यवती
बँकांनी या बँकेची स्थापना केली.
२) मुख्यालय – बेसल (Basel), स्वित्झर्लंड
३) प्रातिनिधिक कार्यालये – हाँगकाँग व मेक्सिको
४) सदस्य -६० देश
५) अध्यक्ष – जेन्स वीडमन (२०१६)
६) भारताचे प्रतिनिधित्व ९ सप्टेंबर, १९९६ रोजी पहिल्यांदा झालेल्या बँकेचा सदस्यत्व विस्तार मध्ये भारत BIS चा सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करू लागला.
उद्देश –
१) मध्यवर्ती बँकांची बँक म्हणून कार्य करणे
२) आंतरराष्ट्रीय मौद्रिक आणि वित्तीय व्यवस्थेत सुधारणा करून सुस्थिती निर्माण करणे
३) सदस्य देशांचा आंतरराष्ट्रीय व्यवहार सुस्थितीत चालवण्यासाठी नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करणे
४) आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकांसाठी समान निकष लागू करणे
बेसल – 1 निकष
१) १९८८ मध्ये बेसल – I निकष घोषित केल’
२)या निकषांमध्ये सर्वाधिक कर्जजोखिमेवर भर देण्यात आला.
३) या निकषांमध्ये समितीने बँकांना किमान भांडवल पर्याप्ततेची तरतूद केली.
4) यानुसार आंतरराष्ट्रीय बँकांनी किमान ८ % भांडवल पर्याप्तता (CRAR) राखण्याचे बंधन घालण्यात आले.
५) भारतामध्ये RBI ने १९९२ मध्ये बेसल – I केले.
६) भारतीय बँकांच्या विदेशात असणाऱ्या शाखांना मार्च १९९४ पर्यंत, तर इतर बँकांनी मार्च १९९६ पर्यंत हा निकष पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले.
बेसल II निकष
१) बेसल समिति ने जून २००४ मध्ये बेसल – II निकष जाहीर केले.
२) बेसल I मध्ये फक्त कर्जविषयक जोखिमांवर भर दिला होता. बेसल – II मध्ये कर्जविषयक तसेच
बाजारविषयक व कार्यात्मक जोखिमांवर भर देण्यात आला.
३) बेसल -II निकषांचा मुख्य उद्देश हा होता की, कितीही अधिक जोखिम असेल, त्या परिस्थितीतही
बँका दिवाळखोर न बनता त्याचा सामना करतील.
४) बेसल – 11 मध्ये एकूण भांडवल पर्याप्तता ९ % राखण्याचे बंधन घालण्यात आले.
बेसल – III निकष
२००८ च्या जागतिक वित्त संकटापासून सावरण्यासाठी डिसेंबर २०१० मध्ये बेसल III निकष घोषित करण्यात आले.
बेसल – III निकषांचे बंधन २०१३ मध्ये लागू करून ते २०१५ पर्यंत पूर्ण करायचे होते, परंतु BCBS कडून त्याची कालमर्यादा ३१ मार्च, २०१८ व नंतर ३१ मार्च, २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
बेसल -III निकषांचे मुख्य उद्देश
१) वित्तीय व आर्थिक जोखिमांना सामोरे जाण्याची बँकांची क्षमता वाढविणे
२) बँकांचे योग्य व्यवस्थापन करणे
३) बँकांची पारदर्शकता वाढविणे
४) बँकांच्या कार्याच्या गुणवत्तमध्ये वाढ करणे
या निकषांमध्ये एकूण भांडवल पर्याप्तता ९% राखण्याचे बंधन घालण्यात आले, बँकिंग सेवा
बँकांद्वारे डिजिटल वित्तीय सेवांचा (DPS) प्रमुख उद्देश हा प्रामुख्याने समाजातील मुख्य प्रवाहातून बाहेर व अधिकारविरहित व्यक्तींना डिजिटल उपलब्धतेअंतर्गत वित्तीय सेवांच्या वापराची संधी उपलब्ध करून देणे. अशा सेवा ग्राहकांच्या गरजेनुसार उपलब्ध करण्यात येतात. अशा सेवा उपलब्धीसंबंधी बँकांद्वारे नाममात्र शुल्क आकारण्यात येते.
क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड हे बँका किंवा RBI अधिकृत इतर कंपन्यांद्वारे उपलब्ध करण्यात येते. अशा कार्डचा वापर देशांतर्गत तसेच विदेशातही करता येतो.
१) या कार्डअंतर्गत खातेदाराने रक्कम काढल्यास किंवा देणी दिल्यास खातेदाराने कार्ड पुरविण्याच्या बँकेकडून तेवढे कर्ज घेतले असे समजण्यात येते.
२) या कार्डअंतर्गत ग्राहकास निश्चित रक्कम काढण्याची कमाल आणि किमान मर्यादा कार्डधारकांची पत पाहून बँकाद्वारे ठरविली जाते.
३) बँका क्रेडिट कार्डधारकास कार्डवापराची फी, काढलेल्या रकमेवर व्याज, कर्जाची रक्कम भरण्यास वेळ लागल्यास त्यावर दंडही आकारतात.
डेबिट कार्ड
१) डेबिट कार्ड हे खातेधारकास खाते असणाऱ्या बँकेद्वारे उपलब्ध करण्यात येते जे बँक खात्याशी जोडण्यात आलेले असते.
२) डेबिट कार्ड हे खातेधारकास चालू तसेच बचत खात्यावरती उपलब्ध करण्यात येतात.
३) डेबिट कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारावरील रक्कम बँकांद्वारे ताबडतोब खात्यावरून कट किंवा कमी करण्यात येते.
४) अशा कार्डचा वापर खातेधारक खात्यातील रक्कमेच्या मर्यादेपर्यंतच करू शकतो.
५) या कार्डचा वापर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देशांतर्गत निधी पाठविण्यासाठी करण्यात येतो.
रुपे कार्ड (Rupay Card)
रुपे कार्डची निर्मिती Rupay आणि payment यातील रुपयाम की, धील रु आणि भूगतान (देणी) मधील ‘पे’ द्वारे रुपे कार्डची निर्मिती करण्यात आली आहे.
२) रुपे कार्ड हे जागतिक स्तरावरील विसा, मास्टर कार्ड याप्रमाणे कार्य करते.
३) रुपे कार्डद्वारे ATM मधून पैसे काढणे, POS (Poit Of Sale) आणि ऑन-लाईन देवाण-घेवाण यासारख्या सुविधा उपलब्ध होतात.
४) रुपे कार्ड हे भारतीय असल्याने या कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारावरती इतर कार्डच्या तुलनेत कमी दर आकारण्यात येतात.

प्रीपेड कार्ड
१) प्रीपेड कार्ड से क्रेडिट कार्ड प्रमाणेच कार्य करते. परंतु याचा वापर करताना वापरकर्ता स्वत:च्या पैशाचा वापर करतो. तो उधारीच्या पैशाचा वापर करीत नाही.
२) प्रीपेड कार्ड मोबाईल कार्ड प्रमाणे रिजार्च करावे लागते.
३) प्रीपेड कार्ड हे ग्राहकच्या बँक खात्यातून प्री-लोडेड करण्यात येते.
ATM (Automated Teller Machine)
१) हे एक इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन असणारे साधन असून एक चुंबकीय स्ट्रीप किंवा प्लॉस्टिक कार्ड असलेले पेमेंट कार्ड आहे, ज्यामध्ये अद्वितीय कार्ड नंबर आणि काही सुरक्षा माहिती आहे. उदा – कार्डची समाप्ती तारीख.
२) ATM कार्ड हे बैंक कार्ड, MAC (मनी एक्सेस कार्ड) क्लायंट कार्ड, कि.कार्ड किंवा कँश कार्ड इत्यादी नावानेही ओळखले जाते.
३) ATM कार्डचा वापर खात्यातून पैसे काढणे किंवा खात्यात पैसे जमा करणे, खात्याचे Mini Statement तपासणे, खात्यातील शिल्लक रक्कम तपासणी, Pin नंबर बदलणे, पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाटविणे, चेकबुकसाठी विनंती अर्ज करणे इ. साठी करण्यात येतो.
४) ATM सुविधा ही चालु आणि बचत खात्यावरती किमन रक्कम असणाऱ्या खातेदारांना उपलब्ध करण्यात येते;.
५) ATM एक प्लॅस्टिक कार्ड असून त्यावरती कार्डधारकाचा खाते क्रमांक व सही असते. त्याचबरोबर कार्डधारकास कार्ड देताना एक गुप्त कोड क्रमांक देण्यात येतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles