१) अग्रगामी करसंक्रमण
“उत्पादकाकडून घाऊक व्यापाऱ्याकडे, व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे व पुढे किरकोळ व्यापाऱ्याकडून अंतिमत: ग्राहकाकडे असे होणारे कराचे संक्रमणकर म्हणजे अग्रगामी कर संक्रमण होय.”
२) प्रतिगामी संक्रमण
“जेव्हा ग्राहकावर लादलेला कर उत्पादकाकडे व उत्पादकाकडून उत्पादन घटकाकडे ढकलला जातो, तेव्हा त्याला प्रतिगामी कर संक्रमण असे म्हणतात.करभाराचे पुढील प्रकार पडतात
१) मौद्रिक करभार
“कर दात्याकडून कर वसूल केल्यावर हा करभार पैशाच्या स्वरूपात ज्या व्यक्तीवर
पडतो, त्याला मौद्रिक करभार म्हणतात.”