Sunday, May 26, 2024

GST ची पार्श्वभूमी

१)१९५४ मध्ये सर्वप्रथम फ्रान्स या देशाने GSTचा स्विकार केला..

२) भारतात GST संदर्भात सर्वप्रथम वर्ष २००० मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी प.बंगालचे तत्कालीन वित्तमंत्री असीम दासगुमा यांच्या अध्यक्षतेखाली उतजना्थ समिती नेमली.

३) GST चीसंकल्पना सर्वप्रथम २००४ मध्ये नेमलेल्या विजय केळकर समितीने मांडली.

४) २००६-०७ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पी, चिदंबर यांनी १ एप्रिल, २०१० पासून GST लागू करण्याचे घोषित केले. परंतु GST लागू करणे शक्य झाले नाही.

५) काँग्रेस सरकारने GST लागू करण्यासाठी११५ चे घटनादरूस्ती विधेयक, २०११ संसदेत

मांडले. परंतु १५ वी लोकसभा विसर्जित झाल्याने हे विधेयक संमत झाले नाही.

६) मोदी सरकारने१९ डिसेंबर, २०१४ रोजी GST संदर्भात २२ वे घटनादुरूस्ती विधेयक, २०१४ लोकसभेत सादर केले.

७)६ मे, २०१५ रोजी लोकसभेत GST विधेयक,२०१४ ला मंजूरी देण्यात आली.

८)२९ जुलै, २०१५ रोजी राज्यसभेच्या प्रवर समितीने GST संदर्भातील आपला अहवाल सादर केला.

९)३ ऑगस्ट, २०१६ रोजी राज्यसभेने GST विधेयक, २०१४ ला काही दुरूस्त्यांसह मंजुरी दिली.

१०) राज्यसभेने विधेयक मंजूर केल्यानंतर राज्यांच्या संमतीसाठी (किमान निम्या राज्यांच्या) विधेयक पाठवण्यात आले.

११) GST विधेयक,२०१४ ला मंजुरी देणारे आसाम हे पहिले राज्य ठरले.

१२) २९ ऑगस्ट, २०१६ ला GST विधेयकाला मंजूरी देणारे महाराष्ट्र है दहावे राज्य ठरले.

१३) राष्ट्रपतींची संमती मिळण्यासाठी एकुण २३ राज्यंनी GST विधेयक मंजूर केले.

१४)८ सप्टेंबर, २०१६ रोजी GST विधेयक,२०१४ ला राष्ट्रपतींनी संमती दिली.

१५) केंद्रीय कॅबिनेटद्वारे १२ सप्टेंबर, २०१६ रोजी वस्तू व सेवा कर परिषदेच्या स्थापनेस मंजूरी देण्यात आली.

१६) १६ सप्टेंबर, २०१६ रोजी १२२ वे घटनादुरूस्ती विधेयक १०१ वा घटनादुरूस्ती कायदा म्हणून अंमलात आला.

१७) नोव्हेंबर, २०१६ रोजी वस्तु आणि सेवा कर परिषदेद्वारे GST च्या चार दरास मान्यता देण्यात आली.५%, १२%, १८%, २८% .

१८)३० जून, २०१७ च्या मध्यरात्री १२ वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वस्तू व सेवा कर (GST) अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली.

१९)१ जुलै, २०१७ पासून जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतात GST लागू करण्यात आला.

२०)८ जुलै, २०१७ रोजी जम्मू काश्मीर GST कायदा पारित केला व नंतर CGST कायदा लागू केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles