Sunday, May 26, 2024

🎓भारतातील नियोजनाचा इतिहास 🎓

🎓भारतातील नियोजनाचा इतिहास 🎓

👌 विश्वेश्वरय्या योजना (1934) *

👌FICCI (Federation of India Chamber of Commerce and Industry) योजना – (1934)

👌राष्ट्रीय नियोजन समिती (National Planning Committee) – (1938)

👉बॉम्बे योजना – (1944) …

👌 विश्वेश्वरय्या योजना (1934) * एम.विश्वेश्वरय्या तत्कालिन म्हैसुर प्रांताचे दिवाण व प्रसिद्ध सिव्हील इंजिनिअर होते. * “The Planned Economy for India” या पुस्तकात सर्व प्रथम त्यांनी भारतासाठी नियोजनाची आवश्यकता
स्पष्ट केली. आपल्या योजनेत त्यांनी औद्योगिकीकरणावर भर दिला आणि “औद्योगिकीकरण करा किंवा नष्ट व्हा”, असा इशारा दिला. औद्यागिक विकासामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील त्यामुळे कृषी क्षेत्राकडून उद्योगाकडे लोकसंख्येचे स्थलांतरण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी भारतासाठी 10 वर्षाच्या नियोजनांचा आराखडा मांडला. कृषी क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे लोकसंख्येचे स्थानांतरण साध्य झाले तर पुढील दहा वर्षांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न दुप्पट हाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपल्या पुस्तकात त्यांनी “नियोजन करा किंवा नष्ट व्हा” असा इशारा दिला.

👌FICCI (Federation of India Chamber of Commerce and Industry) योजना – (1934)
फिक्की संघटनेने एन.आर.सरकार यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीद्वारे एक राष्ट्रीय योजना
सुचविण्यात आली.
फिक्की संघटना भांडवलवादी असून देखील या संघटनेने मुक्त/बाजार अर्थव्यवस्थेला विरोध केला आणि राष्ट्रीय
स्तरावर नियोजन करण्यासाठी एका राष्ट्रीय नियोजन आयोगाची आवश्यकता स्पष्ट केली.

👌राष्ट्रीय नियोजन समिती (National Planning Committee) – (1938) * 1938 च्या हरिपूर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मेघनाद सहा यांच्या विनंतीवरून अधिवेशनाचे अध्यक्ष
श्री.सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली. या समितीच्या स्थापनेमागे महात्मा गांधींची प्रेरणा होती. सुरवातीला एम.विश्वेश्वरय्या या समितीचे अध्यक्ष होते -मेघनाद सहा यांनी केलेल्या विनंतीमुळे त्यांनी राजीनामा दिला व पंडित नेहरू या समितीचे अध्यक्ष बनले.
राष्ट्रीय नियोजन समितीच्या 29 उपसमित्या व 15 सदस्य होते.
1950 साली स्थापन करण्यात आलेला नियोजन आयोग याच समितीच्या शिफारशींवर आधारीत होता.

👉बॉम्बे योजना – (1944) …
1944 साली मुंबईमधील आठ प्रमुख उद्योगपतींनी मिळून ही योजना बनवली.

  • जे.आर.डी.टाटा, जी.डी.बिर्ला, पुरुषोत्तमदास ठाकुरदास, लाला श्रीराम, कस्तुरभारई लालभाई, ए.डी.श्रॉफ,
    आर्देशिर दलाल, जॉन मथाई योजनेचे नाव – “A Brief Memorandum Outlining a Plan of Economic Development for India.” या योजनेलाच “बिर्ला टाटा योजना” असे म्हणतात. या योजनेत तीव्र औद्योगिकीकरण व जमिन सुधारणा या घटकांवर भर दिला गेला. या योजनेत पुढील पंधरा वर्षांमध्ये देशातील दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याचे व राष्ट्रीय उत्पन्न तिप्पट करण्याचे ध्येय ठेवण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles