Saturday, July 27, 2024

स्थूल देशांतर्गत उत्पन्न (Gross Domestic Product – GDP)

“देशाच्या भौगोलिक सीमारेषा एका वर्षाच्या कालावधीत सर्व उत्पादकांट्टारे उत्पादित अंतिम वस्तु आणि सेवांचे बाजार किमतीनुसार येणारे पैशातील मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय.”
स्थूल देशांतर्गत उत्पन्न प्राप्त करण्यासाठी अंतिम वस्तू आणि सेवांच्या घटकांना बाजार किमतीने गुणले जाते.
GDP Px Q P = बाजार किंमत
Q= अंतिम वस्तू आणि सेवा
उदा:- समजा भारतामध्ये स्वदेशी नागरिक देवेंद्र व विदेशी नागरिक जॉर्ज हे निवास करतात.GDP मापन करताना स्वदेशी नागरिक देवेंद्र व विदेशी नागरिक जॉर्ज या दोघांनी देशात निर्माण केलेल्या एका वर्षातील अंतिम वस्तु आणि सेवा विचारात घेतल्या जातात. या दोघांचे एकत्रित उत्पादन म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP)होय.
जीडीपी – मध्ये वस्तू आणि सेवांची किंमत बाजार किमतीनुसार निश्चित केली जाते.
जीडीपी – मध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषेअंतर्गत स्वदेशी आणि विदेशी नागरिकांद्वारे उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो.
जीडीपी – मध्ये दुहेरी मापन टाळण्यासाठी अंतिम वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो.
जीडीपी अंतर्गत – अप्रत्यक्ष कराच्या रकमेचा समावेश केला जातो.

जीडीपी – मध्ये चालू वर्षातील वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो. मागील वर्षातील वस्तूंचा समावेश केला जात नाही.
जीडीपी – मध्ये शेअर, बाँड, भांडवली नफा, काळा पैसा, हस्तांतरण भूगतान, वित्तीय भांडवल इ. चा समावेश केला जात नाही.
जीडीपी – मध्ये अशा वस्तूंचा समावेश होतो, ज्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात.

1) साधारण स्थूल देशांतर्गत उत्पादन जीडीपी
जेव्हा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये चलनवाढ / किमतवाढ समाविष्ठ केली जात नाही, तेव्हा त्यास साधारण स्थूल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात.

2) वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी)
जेव्हा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये चलनवाढ / किंमतवाढ समाविष्ठ केली जाते, तेव्हा त्यास वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात.
ए) वास्तविक जीडीपी हा साधारण जीडीपी पेक्षा अधिक असतो, कारण वास्तविक जीडीपी अंतर्गत चलनवाढ / किंमतवाढ समाविष्ठ असते.

3) घटक खर्चानुसार देशांतर्गत उत्पन्न
एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमारेषेत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे घटक खर्चानुसार येणारे पैशातील मूल्य म्हणजे घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय
जीडीपी – मिळवण्यासाठी जीडीपीमधून अप्रत्यक्ष कराची रक्कम बजा केली जाते व अनुदानाची रक्कम समाविष्ठ केली जाते.
घटक खर्च म्हणजे – एखाद्या वस्तू किंवा सेवांच्या निर्मितीस आलेला खर्च होय. उदा- निर्मात्यास पेनचे टोपन निर्मिती खर्च 50 पैसे, रिपील 75 पैसे, मागील टोपन 50 पैसे, पेनाची काच 1 रुपया असे एकूण 2.75 पैसे हा घटक खर्च होय.

4) बाजार किंमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न
बाजार किंमत अशी किंमत असते या किंमतीस एका उपभाक्त्याद्वारे वस्तूच्या खरेदी वेळी विक्रेत्यास देण्यात येते. बाजार किंमत काढण्यासाठी घटक किंमतीत सरकारला भरण्यात आलेले कर समाविष्ठ केले जातात तर सरकारद्वारे देण्यात येणारे अनुदान घटक किंमतीतून वजा केले जाते.

बाजार किंमत म्हणजे = बाजारातील मागणी आणि पुरवठा यांच्या संयोगातून निश्चित झालेली किंमत होय.
मागणी अधिक – पुरवठा कमी = किंमत वाढ
मागणी कमी – पुरवठा अधिक = किंमत घट
मागणी = पुरवठा – किंमत स्थिरता

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles