Friday, July 26, 2024

निव्वळ देशांतर्गत उत्पन्न (Net Domestic Product NDP)

  • “देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या काळात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तु व सेवांच्या पैशातील एकूण मूल्यातून इीज खर्च (घसारा) वजा केला असता मिळणारे उत्पन्न म्हणजे निब्वक देशांतर्गत उत्पन्न होय.
    NDP GDP-Depreciation (झीज / घसारा)
    उदा- देशाच्या भौगोलिक सीमारेषेत स्वदेशी नागरिक देवेंद्र व नागरिक जॉर्ज या दोघांनी निर्माण केलेल्या एका वयतिल अंतिम चम्न आणि सेवाच्या पैशातील एकूण मूल्यातून झीज खर्च (घसारा) वजा केला असता निव्वळ देशांतर्गत उत्पन्न (NDP) प्राप्त होतो.
    RANDP आणि GDP मध्ये अंतर हे (झीज) खर्चामुळे निर्माण होते.
    २) जेव्हा NDP मध्ये (Depreciation) झीज खर्च समाविष्ट असतो, तेव्हा NDP> GDP असते.याउलट जेव्हा NDP मधुन -झीज खर्च वजा केला असता NDP< GDP असते.
    १) घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन-
    “एका वर्षाच्या काळात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तु
    व सेवांचे घटक खर्च नुसार निव्वळ पैशात मूल्य म्हणजे
    घटक खर्च नुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय.”
    NDP fe=NDP mp – Indirect Tax Depreciation
  • निव्वळ राष्ट्रीय उत्पादन (NNP -Net National Product )
  • “निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळवण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य, या मूल्यातून घसारा / झीज खर्च वजा केला असता मिळणारे एकूण उत्पन्न म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय.”
  • NNP = GNP – Depreciation ( Depreciation – घसारा / झीज)
  • उटा – NNP प्राप्त करताना स्वदेशी नागरिक देवंद्रने विदेशात (अमेरिकेत) प्राप्त केलेल्या उत्पन्नाची बेरीज केली जाते व विदेशी नागरिक जॉर्जने आपल्या देशात (स्वदेशी /भारतात) प्राप्त केलेल्या उत्पन्न बजा केले जाते.यातून जे निच्चळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त होते या निच्वळ उत्पादनातुन जेव्हा घसारा झीज खर्च वजा केला जातो तेव्हा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त होते.
  • उत्पन्न / घटक खर्चा पद्धती –
  • उत्पन्न पद्धतीत एका वर्षाच्या काळात देशातील व्यक्ती व संस्था यांनी मिळविलेल्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करुन राष्ट्रीय उत्पन्नाची निश्चिती केली जाते. प्रा.बाऊले व रॉबर्टसन यांच्या मते उत्पन्न पद्धतीत आयकर देणारे व न देणारे अशा दोघांच्या उत्पन्नाचा समावेश होतो.
  • राष्ट्रीय उत्पन्न = एकूण खंड + एकूण श्रम
  • एकूण व्याज + एकूण लाभ
    उत्पन्न पद्धत सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते.
  • खर्च / उपभोग बचत पद्धती
    खर्च पद्धती ही उपभोगावर आधारलेली असून या पद्धतीत एका वर्षाच्या काळात देशात होणार्या एकूण खर्चाची म्हणजे खासगी व सरकारी खर्च यांची बेरीज करुन राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. म्हणून या पद्धतीत उत्पन्नाचा भाग एक तर उपभोगावर खर्च होतो किंवा बचत केली जाते.
    खर्च पद्धतो = बचत + उपभोग खर्च
  • उत्पादन / मालसाठा पद्धती
    उत्पादन पद्धतीत एका वर्षाच्या काळात अर्थव्यवस्थेत प्रत्येक क्षेत्राकडून उत्पादन झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य विचारात घेतले जाते.
    1) उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांची निव्वल मुल्य गृद्धी दर्शविते.
    2) राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पन्न आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रीत वापर केला जातो.
    A) अर्थतज्ज्ञ कुझनेट हा उत्पादन पद्धतीस वस्तू व सेवा पद्धती म्हणतो.
    उत्पादन पद्धत = जीडीपी + देशातील नागरिकांचे विदेशात मिळवलेले उत्पन्न – घसारा
    राष्ट्रीय उत्पादनाचे दुहेरी मापन टाळण्यासाठी उत्पादन पद्धतीत दोन वर्यायी पद्धती सांगितल्या जातात.

    1) अंतिम वस्तू पद्धती
    अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात. अंतिम वस्तू पद्धतीत फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. कारण अंतिम वस्तूच्या मूल्यात मध्यम वस्तूच्या मूल्याचा समावेश केलेला जातो.

    २) मूल्यवृद्धी पद्धती
    राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना टाळण्यासाठी मूल्यवृद्धी पद्धती वापरतात. एकच वस्तू दोन
    वेळा राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जाऊ नये यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो.
    उदा. – शेतकरी कापसाचे उत्पादन करतो आणि तो व्यापाऱ्यास ७०० रु. ला विकतो.
    व्यापाऱ्याने तो कापूस सूतगिरणी मालकास १००० रु. ला विकला. सूतगिरणी मालक त्या
    कापसापासून कापड तयार करून किरकोळ व्यापाऱ्यास १३०० रु. ला विकतो. किरकोळ
    व्यापारी तयार कापड उपभोक्त्यास १४०० रु. ला विकतो. शेतकरी ७०० का व्यापारी…
    रु., सूतगिरणी मालक ३०० रु., किरकोळ व्यापारी १०० रु. ची मूल्यवृद्धी करतो. या सर्व
    मूल्यवृद्धीची बेरीज १४०० रु. आहे. म्हणून या पद्धतीने १४०० रु. राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जातात.
  • क्रयशक्ती (खरेदीशक्ती) समानता
    (Purchasing Power Parity – PPP)
    १) या निर्देशांकाचा वापर दोन चलनांच्या क्रयशक्तीची (खरेदीशक्ती) तुलना करण्यासाठी केला जातो.
    २) कोणत्याही देशाच्या चलनाच्या क्रयशक्तीची तुलना अमेरिकन डॉलरच्या क्रयशक्तीशी केली जाते.
    ३) अमेरिकेत एका डॉलरमध्ये जेवढ्या वस्तू व सेवा विकत घेऊ शकतो, तेवढ्याच वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी भारतात जेवढे रुपये लागतील तेवढ्या रूपयांची व एका डॉलरची क्रयशक्ती समान आहे असे म्हणतात.
    ४) क्रयशक्ती समानतेचा दर हा दोन चलनांचा ‘वास्तविक विनिमय दर’ दर्शवित असतो.
    4) क्रयशक्ती समानता दर हा मौद्रिक विनिमय दरापेक्षा भिन्न असतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles