Friday, May 17, 2024

रिओ परिषद १९९२ (वसुंधरा परिषद – Earth Summit)

कालावधी -३ ते १४ जून, १९९२

ठिकाण – रिओ-दि-जानेरो, ब्राझील

शीर्षक -संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकास परिषद (UN Conference on Environment and Development -UNCED)

१) या परिषदेत पर्यावरण व विकासया विषयावर भर देण्यात आला.

२) या परिषदेत शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणारा २१

अजेंडा हा महत्त्वाचा करार करण्यात आला.

३) या करारात महिला सबलीकरण, स्थानिक सरकारी व बिगर सरकारी संघटनांचे सशक्तीकरण, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान, मानव संसाधन विकास, पर्यावरणाचे संरक्षण, वनसंवर्धन, शहराचा शाश्वत विकास, कृषी विकास आणि जैवतंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला.

४) तसेच पर्यावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण पर्यावरणाला घातक ठरेल एवढ्या स्त्री पेक्षा कमी ठेवण्याच्या उद्देशाने हा  UNFCC (United Nations Framework Convention on Climate Change) करार करण्यात आला.

५) जैवविविधता अभिसंधी तसेच वनसंवर्धन तत्वावरील करारांवरही चर्चा करण्यात आली.

रिओ + 5 परिषद, 1997

कालावधी –  23 ते 27 जून, 1997

ठिकाण – न्यूयॉर्क

उद्देश – अजेंडा 21 कराराच्या अंमलबजावणीचे पुनमूल्यांकन करणे

 – रिओ परिषदेनंतर 5 वषाानी परिषद भरलेल्यामुळे याला रिओ + 5 परिषद असे म्हणतात.

रिओ +१० परिषद, २००२ (Rio +10 Summit)

कालावधी – २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर, २००२

ठिकाण – जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका)

शीर्षक – शाश्वत विकासाची जागतिक परिषद (WSSD – World Summit on Sustainable Development)

१) १९९२ च्या रिओ परिषदेनंतर 1० वर्षांनी ही परिषद भरल्यामुळे याला रिओ +1० असे म्हणतात.

२) या परिषदेमध्ये पाणी व स्वच्छता, ऊर्जा, मानवी आरोग्य, कृषी आणि जैवविविधता व पर्यावरण व्यवस्थापन या विषयांवर चर्चा करण्यात आली.

३) दारिद्रय निर्मूलन, आंतरराष्ट्रीय सहकार्य, महिला सबलीकरण तसेच विकसनशील देशांचा शाश्वत विकास यांचा समावेश असणारा जोहान्सबर्ग घोषणा’ कृती आराखडा संमत करण्यात आला.

* करार

UNFCCC AT (United Nations Framework Convention on Climate Change)

१) १९९२ च्या रिओ परिषदेत (ब्राझील) UNFCC हा करार संमत करण्यात आला.

२) २१ मार्च, १९९४ पासून हा करार अंमलात आणला गेला.

३) हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे.

४) उद्देश – हरितगृह वायूंचे प्रमाण पर्यावरणाला घातक ठरेल एवढ्या स्तरापेक्षा कमी ठेवणे

५) हा करार संमत करणारे १९७ सदस्य आहेत.

६) या सदस्यांना ‘Parties’ असे म्हणतात.

७) या कराराची अंमलबजावणी व पर्यावरण बदलाशी संबंधित आढावाघेण्यासाठी १९९५ पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण बदलावरील वार्षिक परिषदा भरवण्यात आल्या.

८) Parties या सदस्यांची परिषद म्हणून यांना COP (Conference of the Parties) म्हणतात.

– आतापर्यंत २४ परिषदा झाल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles