Saturday, July 27, 2024

शाश्वत विकास परिषद (Sustainable Development Summit)

Sustainable Development Summit

कालावधी – २५ ते २७ सप्टेंबर, २०१५

ठिकाण – न्यूयार्क

१) राष्ट्र आमसभेच्या ७० व्या शाश्वत विकास परिषदेमध्ये Transforming our world the 2030 Agenda for Sustainable Development’ शिर्षकाचा अहवाल स्वीकारण्यात आला. यामध्ये ‘शाश्वत विकासाची लक्ष्ये’ (Sustainable Dedevelopment Goals – SDGs) स्वीकारण्यात आली.

२) २५ सप्टेंबर, २०१५ रोजी १९३ सदस्य देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत शाश्वत विकासाची ध्येये स्वीकारली.

३) ही ध्येये १ जानेवारी, २०१६ ते ३१ डिसेंबर, २०३० पर्यंतच्या १५ वर्षांच्या लावधीसाठी स्वीकारली असून २०३० पर्यंत ती साध्य करायची आहेत.

४) SDGs मध्ये १७ ध्येये व १६९ लक्ष्यांचा समावेश आहे.

५) ही लक्ष्ये जगातील सर्व देशांना लागू असतील.

६) ही लक्ष्ये दारिद्रय,उपासमान, असमानता, आरोग्य, शिक्षण, हवामान बदल व पर्यावरण संवर्धना संबंधित आहेत.

ध्येय १ – संपूर्ण जगातील दारिद्रय नष्ट करणे

लक्ष्ये – १.२५ डॉलरपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचे दारिद्रय शून्य करणे तसेच दारिद्रयरेषेखालील लोकांचे प्रमाणनिम्यावर आणणे

ध्येय २ – उपासमार दूर करणे, अन्नसुरक्षा प्राप्त करणे, पोषणात वाढ करणे तसेच शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे

लक्ष्ये – उपासमार ग्रस्त लोकांचे प्रमाण शुन्यावर आणणे, किशोरवयीन मुले, गरोदर व स्तनदा मातांच्या पोषणाच्या गरजा भागविणे, कृषि उत्पादन व उत्पन्न दुप्पट करणे

ध्येय ३- सर्वांमध्ये चांगल्या आरोग्याची भावना निर्माण करणे

लक्ष्ये – जागतिक स्तरावरील मातामृत्यू प्रमाण ७० पेक्षा खाली आणणे, ५ वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, एड्स-मलेरिया-क्षयरोग यासारख्या आजारांचा प्रसार रोखणे, असांसर्गिक आजारांवर प्रतिबंध करणे व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १/३ ने कमी करणे, २०२० पर्यंतअपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करणे

ध्येय ४ – सर्वसमावेशक व दर्जेदार शिक्षण सर्वांना देणे.

लक्ष्ये – सर्व मुले-मुलींना मोफत प्राथमिक तसेच माध्यमिकशिक्षण देणे, मुला-मुलींमधील असमानता दूर करणे, सर्व स्त्री-पुरूषांना तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण देणे, सर्वानाशाश्वत विकासाचे ज्ञान व कौशल्य पुरविणे

ध्येय ५ – लिंग समानता व महिलांचे सशक्तीकरण करणे

लक्ष्ये-  महिला व मुलींवर होणारे सर्व अत्याचार समाप्त करणे, राजकीय-आर्थिक-सार्वजनिक क्षेत्रात महिलांना सहभागी करून त्यांना नेतृत्वाची समान संधी देणे, महिलांचे सशक्तीकरण करणे

ध्येय ६ – स्वच्छ पाणी उपलब्ध करून त्याचे शाश्वत नियोजन करणे

लक्ष्ये – सर्वांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, पाण्याचे प्रदूषण रोखणे तसेच पाण्याचे शाश्वत नियोजन करणे

ध्येय ७-परवडण्याजोगी शाश्वत ऊर्जा उपलब्ध करणो

लक्ष्य – सर्वांना परवडण्याजोगी ऊर्जा उपलब्ध करून आधुनिक ऊर्जा शाश्वतता टिकवणे, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेचा हिस्सा वाढविणे

ध्येय ८ समावेशक शाश्वत आर्थिक वाढीस प्रोत्साहन, उत्पादक रोजगार आणि सर्वांना चांगले काम देणे

लक्ष्ये – देशाच्या दरडोई उत्पन्नात निरंतर वाढ करणे, अविकसित देशांचा वार्षिक जीडीपी दर ७% साध्य करणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक उत्पादकता वाढविणे, सर्वांना रोजगार पुरवणे, वित्तीय सेवा पुरविण्यासाठी प्रोत्साहन देणे

ध्येय १२ – शाश्वत उत्पादन व उपभोगाचा आकृतीबंधनिर्माण करणे

लक्ष्य – विकसनशील देशांच्या क्षमता व विकासांचा विचार करून शाश्वत उत्पादन व उपभोगासाठी कृती आराखडा राबविणे, नैसर्गिक स्त्रोतांचा शाश्वत वापराची व नियोजनाची पातळी राखणे, अन्न धान्याचा दरडोई अपव्यय कमी करणे

ध्येय १३ – पर्यावरणबदल व त्याचे परिणाम यावर त्वरीत उपाय करणे

लक्ष्ये – पर्यावरण बदलामुळे व इतर नैसर्गिक संकटामुळे येणाऱ्या धोक्यावर उपाय करणे, राष्ट्रीय धोरणात व नियोजनात पर्यावरण बदल कार्यक्रमांचा समावेश करणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles