Friday, July 26, 2024

भारताची लोकसंख्या जलद गतीने वाढण्याची कारणे –

1) बालविवाह
2) भारतीय हवामान
3) मृत्यूदरापेक्षा जननदर जास्त
4) शुद्ध प्रजनन दर अधिक
5) बहुपलित्व
6) विधवा पुनर्विवाहास मान्यता
7) कुटुंब नियोजन मोहिम्ला अपुरा प्रतिसाद
8) आरोग्यविषयक सोयीत वाढ

लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम
1) बेरोजगारीत वाढ
2) आवश्यक सोयी
3) सुविधांवर ताण
4) भांडवल निर्मितीच्या दरावर प्रतिकूल परिणाम
5) दारिद्रया समस्या
6) अन्नधान्याची टंचाई

लोकसंख्या थोडक्यात
1) 2001 च्या तुलनेत 2011 मध्ये देशातील ग्रामीण कुटुंबाकडे असणारे दुरदर्शन संचाची संख 18.9 टक्के वरुन 33.4 टक्केपर्यंत वाढली.
2) 2011 साली ग्रामीण घरामध्ये असणारे टेलिफोनची एकूण संख्या 34.3 टक्के आहे.
3) जनगणना 2011 नुसार देशात 70.6 टक्के नागरी कुटुंबाकडे तसेच ग्रामीण 30.8 टक्के कुटुंबाकडे नळामार्फत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.
4) 2011 नुसार भारतातील सर्वाधिक लोकवस्ती जिल्हा – ठाणे
5) भारतीय संविधानाचे कलम 21 मानव विकासाची संबंधित आहे.
6) भारतीय संविधानाच्या 42 व्या घटनादुरुस्तीनुसार कुटुंब नियोजन व लोकसंख्या नियंत्रण समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आले.
7) 15 वे लोकसंख्या मापन 2011 अंतर्गत पहिल्यांदा राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर तयार करण्यात आले.
8) सरकारद्वारे 1931 नंतर पहिल्यांदा 2011 मध्ये धर्मावर आधारित जनगणना मापन्यास सहमती दर्शविली.
9) 2011 जनगणना ही 1992, 197 व 2002 नंतरची चौि बीपीएल जनगणना आहे.
10) 1951 च्या जनगणनेनंतर सर्वप्रथम कुटुंब नियोजनास प्राध्यान्य देण्यात आले.
11) 2011 नुसार सर्वाधिक शहरी लोकसंख्या असणारे राज्य-गोवा (62.17 टक्के)
12) 2011 नुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्या असणारे राज्य – हिमालय प्रदेश (10.3 टक्के)
13) सर्वाधिक लोकसंख्या वृद्धी झालेला धर्म (2001-2011) – मुस्लीम (24.6 टक्के)

लोकसंख्या धोरणाचा उद्देश
1) देशातील लोकसंख्येसंबंधी समस्यांचे समाधान करणे.
2) लोकसंख्येचे गुणात्मक आणि संख्यात्मक नियंत्रण
3) लोकसंख्या गुणावत्तेत सुधारणा करणे
4) संतुलित / नियोजित कुटूंब
5) भारत हा जगातील पहिला देश आहे, ज्याने लोकसंख्या स्थिर करण्याच्या उद्देशानने 1952 (पहिली पंचवार्षिक योजना)मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम सुुरु केला.
6) भारतात लोकसंख्या धोरणाची खर्या अर्थाने सुरुवात 1976 पासून करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles